आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक पदवीधर मतदार संघाच्या प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रियेला गुरुवारपासुन सुरुवात झाली असुन अर्ज वितरित करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सभागृहात अर्ज वितरित करण्यासाठी स्वंतत्र कार्यालय तयार केले आहे. नामनिर्देशनच्या पहिल्याच दिवशी चार इच्छुकांनी १० अर्ज घेतले आहे. अर्ज दाखल करण्याची १२ जानेवारीपर्यंत मुदत असल्याने दोन दिवसात अर्ज वितरीत करण्याच्या प्रमाणात वाढ होईल.
नाशिकरोड येथील विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात पदवीधर मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन राधाकृष्ण गमे हे काम पहात आहे. आयुक्तालयात २४ तास आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असुन तीन दिवसांत एकही तक्रार प्राप्त झालेली नाही.
गुरुवारपासुन उमेदवारांचे अर्ज वितरित करण्यास सुरुवात झाली असुन यामध्ये धुळे येथील धनराज देविदास विसपुते (२), संगीता धनराज विसपुते (१), डॉ आशिष सुरेश जैन (१), शुभांगी भास्कर पाटील (४) तर नाशिकचे सोमनाथ नाना गायकवाड (२) असे एकुण १० अर्ज प्रशासनाने दिले आहे. तर शासनाच्या वतीने हे अर्ज विनामूल्य देण्यात येत आहे हे दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत वितरित आणि जमा करण्यात येणार आहे. तसेच प्रवर्गातील इच्छुकांसाठी अनामत रक्कम ही ५ हजार तर खुल्या प्रवर्गासाठी १० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. जे इच्चुकांना अनामतसाठी राखीव प्रवर्गातुन अर्ज दाखल करायचे असतील त्यांना जातीचे प्रमाणपत्र जोडणे हे बंधनकारक रहाणार आहे.
मतदान अन मतमोजणीला रहाणार ड्राय डे
विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक ही विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यात होत आहे.त्यामुळे ३० जानेवारी रोजी या पाचही जिल्ह्यातील मद्यविक्री करणारे दुकाने बंद रहाणार आहे. तसेच २ फेब्रुुवारी मतमोजणीच्या दिवशीही मद्य विक्री बंद रहाणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
पदवीधर साठी शासनाने १२ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.६) अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी राहील. त्यानंतर शनिवार व रविवार हे शासकिय सुट्टीचे दिवस आहे. तर सोमवारी साधारण दिवस असुन मंगळवारी ही अंगारक चतुर्थी असल्याने या दिवशी इच्छुक पसंती देण्याची शक्यता आहे, तर १२ जानेवारीला शेवटच्या दिवशी गुरुवार असल्याने या दिवशीही इच्छुकांकडुन अर्ज दाखल करण्याला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.