आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक ग्रामपंचायत निवडणूक:196 ग्रामपंचायतींसाठी 70.45 टक्के मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठापणाला

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी 70.45 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये 2 हजार 897 उमेदवारांनी सदस्य पदासाठी तर 577 उमेदवारांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढविली.

निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे मंगळवारी मतमोजणीनंतर समजणार असुन याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. तर निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हाप्रशासनाने 745 मतदान केंद्रांवर जवळपास 4 हजार 500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तरुण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने यंदा प्रचार शिगेला पोहोचला होता. तालुक्यावर आपला प्रभाव कायम रहावा यासाठी 14 तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी निवडणुक महत्वाची केली होती. वार्डापेक्षा सरपंच पदासाठी सर्वाधिक चुरस निर्माण झाल्याचे दिसुन येत होते.

इगतपुरी 2, कळवण 16, चांदवड 35, त्र्यंबकेश्वर 1, दिंडोरी 6, देवळा 13, नांदगाव 15, नाशिक 14, निफाड 20, पेठ 1, बागलाण 41, येवला 7, सिन्नर 12 या ग्रामपंचायतीमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती 196 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक झाली असून यामध्ये 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन तर 19 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच 579 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित 1291 जागांवर मतदान झाले असून 177 जागा या सरपंच पदासाठी होत्या.

लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा लागली पणाला

जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, नांदुर्डी, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. तर आमदार

छगन भुजबळांच्या मतदारसंघ असलेल्या येवल्यात एक, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघात तिन ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका झाल्याने त्यांनीही ग्रामपंचायत च्या मतदानावर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खासदार असलेल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील 7 तालुक्यात निवडणुका लागल्याने त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती.

बातम्या आणखी आहेत...