आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोक्यावर बँकेचे लाखोंचे कर्ज, औषध दुकानदारांची भरमसाठ उधारी, नातेवाईकांची उसनवारी,लग्नाच्या वयात आलेली मूल, शिक्षणासाठीचा मोठा खर्च, कुटुंबाला पोटासाठी लागणारा खर्च हा सर्व कसा भागवायचा, तुम्हीच सांगा माय बाप, आत्ता आम्ही कस जगायच? एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा मन हेलावून टाकणारा प्रश्न.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भेदक शब्दांचा टाहो गेल्या दोन तीन दिवसांपासून ऐकायला येत आहे. विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी आज लाखो रुपयांची दोन महिन्यात उधळण करत भविष्यातील लाखो रुपये उत्पादन होणार या आशेवर कष्ट करत असतांना अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या थैमनाने अवघ्या काही दिवसात उराशी बाळगून असलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.
मानसिक दृष्टीने खचला
तीन ते साडेतीन महिने दररोज हजारो रुपये खर्च करून वाचविलेल्या द्राक्ष बागा पंधरा दिवसात विक्रीसाठी तयार होतील आणि आपण खर्च केलेले भांडवल वसूल होऊन शिल्लक पैशातून माथी असणारे कर्जफेड करू अशी मानसिक अवस्था झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान हे मन हेलावून टाकणारे आहे. आर्थिक दृष्टीने खचलेला शेतकरी मानसिक दृष्टीने खचला आहे. तीन चार एकर क्षेत्रावर असलेला बागासाठी किमान यंदाचे भांडवल म्हणून किमान पंधरा लाख रुपये खर्च केला आहे, तीन महिने पावसात वेगवेगळ्या रोगांचा सामना करत बागा आज पर्यंत वाचवल्या.
बागांचे अतोनात नुकसान
अवघ्या काही दिवसात प्लॉट देण्यायोग्य होणार असल्याने शेतकरी आनंदात होते. यंदा प्रथमच अर्ली द्राक्षांना चांगला भाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मोठी कसरत करून बागा वाचविल्या. मात्र निसर्गाने बळीराज्याच्या कष्ठाची आणि मनाची परीक्षा पाहावी तशी चौदा दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बागांचे अतोनात नुकसान झाले. भर पावसात आणि प्रचंड दवे पडलेले असताना आशावादी शेतकर्यानी आशा सोडली नाही.
माणूस हरला
कोणतीही क्रिया बुरशीनाशक औषधे करत नसतांना सुद्धा काही अंशी उपयोगात येईल या आशेवर शेतकरी फवारणी करत राहिले. मृत्यूशी झुंज द्यावी तशी निसर्गाशी झुंज दिली आणि अखेर निसर्ग जिंकला. माणूस मात्र हरला.
भुरी,डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आत्ता बागा जाणार अशी परिस्थिती दिसत असतांना सुद्दा शेतकऱ्यांनी फवरणी चालूच ठेवली. शेतकरी मनातून खचला आहे. अनेक संकटे आली तो उभा राहिला. अनेक वेळा आर्थिक स्थिती बिघडली त्यावर पर्याय शोधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.