आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावापरायला दिलेली कार परत न केल्याने मित्राने मित्रांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री इंदिरानगर बोगदा परिसरात घडला. संशयिताने दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने नेम चुकल्याने मोठा गंभीर गुन्हा टळला, याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश टिळे (रा. पंचवटी) यांचा केटरींग व्यावसाय आहे. मित्र विनोद गोसावी याचा मित्र संशयित सुनिल चोरमारे याच्या सोबत ओळख आहे. चोरमारे याचा कार वापरण्यास देण्याचा व्यवसाय आहे. दोघांमध्ये यापुर्वी आर्थिक व्यवहार झाले आहेत.
हे आहे गोळीबाराचे कारण
चार महिन्यापुर्वी सुनिल चोरमारे यास 2 लाख उसने दिले होते. त्यापैकी 1 लाख परत दिले आहे. मित्रांना फिरण्यास जाण्यासाठी 31 डिसेंबर रोजी चोरमारे यांच्याकडून (एमएच 01 बीजी, 5881) कार तीन दिवस वापरण्यासाठी घेतली होती. मात्र, कामानिमित्त कार परत करता आली नाही. संशयित चोरमारे याने फोन करत कार परत का केली नाही म्हणून चोरमारे याने शिविगाळ केली होती.
भीतीपोटी मित्र विनोद गोसावी, राजेंद्र शिंदे, भुषण देशमुख, युवराज सोनवणे, यांच्या सोबत कारमधून उतरुन साईनाथ चौफुली येथे थांबलो असता संशयित चोरमारे याने फोन करुन इंदिरा नगर बोगदा येथे बोलवले. संशयित चोरमारे हा दुचाकीहून आला. त्याच्या सोबत जग्गू सांगळे, राज जोशी, हे दुचाकीहून उतरले काही समजण्याच्या आत संशयित चोरमारे याने तुम्हाला आज जीवंत ठेवतच नाही असे बोलून खिशातून पिस्तुल काढून दोन फायर केले.
सुदैवाने दोन्ही गोळ्यांचा नेम चुकल्याने जीव वाचला. भीतीमुळे कार युटर्न करुन वेगात पलायन करत इंदिरानगर पोलिस ठाणे गाठले. प्रकार मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने इंदिरा नगर पोलिसांना कळवण्यात आला. वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.