आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षांची झाली वाढ:15 वर्षांत 48 लाख झाडांमुळे नाशिक दुप्पट हरित; एकूण झाडांपैकी 97 टक्के झाडे सुस्थितीत; 27 लाख 40 हजार वृक्षांची झाली वाढ

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रकल्पांसाठी वृक्षतोड होत असली तरी वनसंपदेच्या संवर्धनासाठी नाशिककर सकारात्मक झाल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. नाशिक महापालिकेत आजमितीस असलेल्या वृक्षगणनेच्या नोंदीनुसार शहरात ४७ लाख ९५ हजार ३८७ वृक्ष आढळून आले आहेत. तुलनेने यापूर्वी म्हणजेच सन २००७ मध्ये झालेल्या गणनेत हीच संख्या २० लाख ५५ हजार ५२३ होती. याचाच अर्थ गेल्या १५ वर्षांत नाशिक दुपटीहून अधिक हरित झाल्याचे दिसून येत आहे. या काळात नाशिककरांनी तब्बल २७ लाख ४० हजार १६४ वृक्षांची लागवड केली आहे.

विशेष म्हणजे शहरातील ९७ टक्के झाडे सुस्थितीत असून ३ टक्के झाडे तुटलेली व वाळलेली आहेत. तुलनात्मकदृष्ट्या पुणे महापालिकेची लोकसंख्या ६० लाख असताना तेथे केवळ ४५ लाख वृक्ष आहेत. तर नाशिक महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ६२ हजार असून मोठ्या वृक्षसंख्येने नाशिककरांनी शहराला ग्रीन कव्हर केले आहे.

तुलनात्मक अभ्यास केला असता पुणे महापालिकेचे क्षेत्रपळ ३४०.४५ चौरस किलोमीटर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या ३३ लाख ७१ हजार ६२६ व शहरातील ३८ गावांतील लोकसंख्या २५ लाख ३८ हजार ४७३ अशी आहे. याउलट नाशिक शहराचे क्षेत्रफळ २६४.२३ चौरस किलोमीटर असून लोकसंख्या १८ लाख ६२ हजार ७६९ अशी आहे. त्यामुळे वृक्षलागवडीत नाशिककर जागरूक असल्याचे स्पष्ट होत आहे. सिडकोत २० टक्के अर्थातच १५,८६,२७४ वृक्ष आढळले असून असून पांडवलेणी, दाढेगाव, विल्होळीत सर्वाधिक वृक्ष आहेत.

याखालोखाल वॉर्ड क्रमांक ६ व १९ मध्ये १४ टक्के तर वॉर्ड क्रमांक २७ मध्ये १२ टक्के झाडांचा समावेश आहे. या ग्रीन कव्हरसह नाशिकमधील डोंगररांगा, धार्मिकस्थळे, नद्या अशा निसर्ग संपत्तीमुळेच नाशिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. पालिकेच्या वृक्षगणनेनुसार वन विभागाच्या जागेवर सर्वाधिक झाडे आहेत. शासनाच्या ५० कोटी वृक्षलागवडीच्या निर्णयाने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात झाडांचे प्रमाण वाढले आहे. १९९० पासून वृक्षलागवड चांगली होत आहे.

बातम्या आणखी आहेत...