आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता झाडेही होणार डिजिटल:QR कोडवरून मिळणार झाडांची माहिती; उपक्रमाचा विद्यापीठ कुलगुरुंच्या हस्ते शुभारंभ

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विद्यापीठ परिसारातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडद्वारे माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक झाडाला जिओ टॅगिंग केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आलेले क्युआर कोडद्वारे सर्वसामान्यांना वनस्पतींचे औषधी महत्व व माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात विविध प्रकाराचे वनस्पती, वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांना जीओ टॅगींग व क्युआर कोड लेबल लावण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लेफ्टनन्ट जनरल डॉ. राजीव कानिटकर, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठ परिसरास भेट देणारे अभ्यागत, विद्यार्थ्यांना वनसंपदेची माहिती होण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर वनस्पती, वृक्षाची जीओ टॅगींगव्दारे स्थान, वनस्पतीचे शास्त्रीय नाव, मराठी नाव, परिसरातील वनस्पतींची संख्या, औषधी महत्व आदी माहिती उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थी व अभ्यागतांना वनस्पतींचे औषधी महत्व समजेल. विद्यापीठाचे ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत परिसरात विविध प्रकारातील फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती आदींची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. याप्रसंगी हर्बल गार्डनच्या देखभाल करणारे नंदु सोनजे, संतोष केदार यांचा राजीव कानिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद, श्रीधर चितळे, डॉ. उदयसिंह रावराणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विद्यापीठ परिसारातील ‘हर्बल गार्डन’ मध्ये विविध प्रकारचे वनस्पती व वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याकरीता विद्यापीठास सहा हजार 200 रोपांचे वाटप बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनकडून सीएसआर अंतर्गत प्राप्त झाली आहेत. यामध्ये पेरू, जांभूळ, कांचन, बकुळ, चिकू, आवळा, अर्जुन, सिताफळ, करंज, सप्तपर्णी, फणस, बदाम, चित्रक, कुपी आदी विविध प्रकारातील रोपांचा समावेश आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षांचे संवर्धन व जतन करण्याचा संदेश विद्यापीठाकडून सर्वांना देण्यात येत असल्याचे हरित कक्षाचे प्रमुख उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...