आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचा चटका वाढला:कडक उन्हामुळे शुकशुकाट‎, शुक्रवारीही असणार उष्णतेची लाट, आपत्ती विभागाची माहिती

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे, मात्र उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी व शुक्रवारी अशा दोन दिवस उष्णतेची लाट‎ असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. गुरुवारी (दि. ११) शहरातील कमाल तापमान हे ४०.७ अंश सेल्सीअसपर्यंत गेले होते. नाशिक‎ शहरात गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासूनच ऊन वाढत होते, दुपारी १ ते ४ वाजेच्या सुमारास त्याची तीव्रता वाढली असल्याने या काळात‎ नागरिकांनी घरात, कार्यालयात थांबणे पंसत केले. उन्हाचा चटका एवढा तीव्र होता की, दुपारी शहरातील रस्ते ओस पडले होते.‎

४०.७ अंशांवर‎ नाशिकचा पारा

राज्यात उन्हाचा चटका वाढलेला असताना नाशिक शहरात काल ४०. ७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शहरात तापमानात कमालीची वाढ झाली. तीव्र उन्हामुळे नाशिककर हैराण झाल्याचे पहायला मिळाले. आजही उष्णतेची लाट असल्याची माहिती आपत्ती विभागाचे सचिन पाटील यांनी दिली.