आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Hospital Oxygen Leak Inciden, News And Updates; Heart wrenching Incident In Nashik, The Sentiments Expressed By Prime Minister Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक ऑक्सिजन गळती:नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या भावना

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिक रुग्णालय ऑक्सिजन लिक प्रकरणात 22 जणांचा मृत्यू

नाशिक येथील महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या घटने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे.

मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहीले की, 'ऑक्सिजन लिक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या घटनेत अनेकांचे मृत्यू झाल्याने मन हेलावलं. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांप्रती संवेदना', अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रुग्णालयात नेमकं काय घडलं..?

नाशिकच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला.

या घटनेनंतर काही वेळातच ऑक्सिजनच्या टँकची दुरुस्ती करण्यात आली. रुग्णालयात 131 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...