आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० परिषदेच्या निमित्ताने जगातील प्रमुख देशांतील प्रतिनिधी निवडक शहरांना भेटी देणार आहेत. यातून त्या-त्या भागात विदेशी गुंतवणूक भविष्यात माेठ्या प्रमाणात हाेऊ शकेल. महाराष्ट्रातील मुुंबई, पुणे, आैरंगाबाद आणि नागपूर या शहरांची निवड याकरिता करण्यात आली आहे. कृषी, पर्यटन, वाइन कॅपिटल, आैद्याेगिक केंद्र अशा क्षमता असतानाही नाशिकचा समावेश त्यात नसल्याने नाराजी व्यक्त केली. उद्याेजकांनी केवळ राजकीय दुर्लक्षामुळेच नाशिकला संधी मिळत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. नाशिकमध्ये गेल्या एक-दीड तपापासून माेठ्या उद्याेगाची गुंतवणूक आलेली नाही, त्याला अपवाद दाेन वर्षांपूर्वी रिलायन्स लाइफ सायन्सेसने केलेली २२०० काेटींची गुंतवणूक हाेती. विशेष म्हणजे, नाशिकमधून मराठवाड्याला पाणीपुरवठा हाेत असतानाही नाशिकमध्ये पाणी उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाॅरमध्ये आैरंगाबादचा समावेश केला गेला.
येथील नियमित व प्रवाशांची पुरेशी संख्या असतानाही अहमदाबाद, दिल्ली, पुणे या शहरांकरिताची विमानसेवा अचानक बंद झाली. मध्यंतरी उद्याेगांना दिल्या गेलेल्या वीजदर अनुदानात सुरुवातीला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर अन्याय झाला. दुसरीकडे निआे मेट्राेसारख्या घाेषणा झाल्या, पण प्रत्यक्षात काहीच दिसत नसल्याने नाशिककरांमध्ये याची नाराजी व्यक्त हाेत हाेती. त्यात आता जी-२० परिषदेकरिता नाशिकचा समावेश नसल्याने हा नवा अन्याय झाल्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
सुवर्णत्रिकाेणाचा पंचकाेण; त्यात नाशिक कुठे?
मुंबई-पुणे-नाशिक असा सुवर्णत्रिकाेण हाेता, त्यात आैरंगाबादची भर पडली. आता नागपूरचा समावेश हाेऊन हा पंचकाेन झाला पण त्यातही नाशिक कुठे आहे? हा प्रश्न जी-२० परिषदेच्या निमित्ताने चर्चिला जात आहे. - संताेष मंडलेचा, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स
गुंतवणुकीसाठी नाशिक दाखविलेच जात नाही
जी-२० परिषदेकरिता येणाऱ्या प्रतिनिधींना नाशिकमधील कृषी क्षेत्राची, कृषी प्रक्रिया क्षेत्रातील क्षमता, आैद्याेगिक क्षेत्राची क्षमता दाखविता आली असती, पण नाशिक दुर्लक्षित केले जात आहे. गुंतवणुकीसाठी नाशिक दाखविले जात नाही हे दुर्दैव आहे. - मनीष रावल, चेअरमन, एव्हिएशन कमिटी, आयमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.