आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (पीएम स्वनिधी) योजनेत पथविक्रेत्यांना सर्वाधिक कर्जवाटपाचा बहुमान नाशिक महापालिकेने मिळवला. कोल्हापूरला मागे टाकत राज्यात नाशिकने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. १७८४० इतके उद्दिष्ट असताना शहरात २२०८६ पथविक्रेत्यांना कर्जाचे वितरण करण्यात अाले. केंद्र सरकारने १ जून २०२० पासून कर्ज याेजना अाणली.
नाशिक मनपाला १७,८४० चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने २६,२३४ पथविक्रेत्यांनी योजनेसाठी बँकेकडे ऑनलाइन अर्ज केलेले आहे. बँकांनी २४,५८४ कर्ज प्रकरणे मंजूर केलेली आहेत. त्यापैकी २२ हजार ०८६ पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्जाचे वितरण झालेले आहे. या योजनेकडे फक्त पथविक्रेत्यांना कर्ज द्यायची योजना असे न बघता त्यांच्या आर्थिक सामाजिक समावेशक प्रगतीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पथविक्रेत्यांना डिजिटल माध्यमाबाबत प्रशिक्षित करणे व त्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून डिजिटल पेमेंट एग्रीगेटर यांच्या साह्याने पथविक्रेत्यांचे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे.
१४००० पथविक्रेत्यांची सोशल इकोनॉमी प्रोफाइल
केंद्र शासनाने पीएम स्वनिधी योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण (सोशल इकॉनॉमी प्रोफायलिंग) करण्यासाठी देशभरातून पहिल्या टप्प्यात १२५ पायलट शहरांमध्ये नाशिक मनपाची निवड करण्यात आली आहे. मनपाने १४,२३४ पथविक्रेत्यांची सोशल इकोनॉमी प्रोफायलिंग भरून अव्वल स्थान मिळविले आहे. पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी केंद्र शासनाने ''स्वनिधी से समृद्धी'' अभियान सुरू केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.