आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिंदाल पाॅलीफिल्मस कंपनीत रविवारी (दि. 1) दुपारी झालेल्या स्फाेटामुळे लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसतच असून आग लागून 48 तास उलटूनही घाेटी पेालिसांकडून केवळ अकस्मात आग आणि अकस्मात मृत्यूचे गुन्हे दाखल करून त्यावरच धन्यता मानली जात असल्याने पाेलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
विशेष म्हणजे, ऐरवी एखाद्या किरकाेळ घटनेत जसे इमारतीचे बांधकाम सुरू असताना कामगार पडला अथवा कारखान्यात काम करताना कामगार पडल्यास त्याविराेधात तातडीने व्यवस्थापन अथवा बांधकाम व्यावसायिकाविराेधात लागलीच सदाेष मनुष्यवधाचा, निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र या एवढ्या माेठ्या दुर्घटनेत अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करून सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे तपास साेपविण्यात आला आहे.
जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीत दाेन महिला कर्मचाऱ्यांचा जागेवरच जळून मृत्यू झालाआहे. तर २० कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आराेग्यमंत्री डाॅ. भारती पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार आयुक्त विनीता सिंगल यांनी घटनास्थळी भेट देवून प्रशासकीय यंत्रणेला तातडीने घटनेची चाैकशी करण्याचे आदेश दिले.
त्याचवेळी मंत्र्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची संख्या, फायर ऑडीट, कामगारांची सुरक्षितता याबाबत चाैकशी केली असता त्यांनी माहिती देणे टळण्याने त्यंना धारेवर धरले हाेते. दरम्यान, रात्री उशिरा पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप व उपअधीक्षक अजुर्न भाेसले यांच्या मार्गदर्शनाखाली घाेटी पाेलिस ठाण्यात अकस्मात आगीचा आणि दाेन मृत्यू झाल्याबद्दल अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक उपनिरीक्षकांकडे साेपविण्यात आला आहे.
यासंदर्भात, उपअधीक्षक भाेसले यांच्याशी संर्पक साधला असता प्रथमदर्शनी अकस्मातच दाखल हाेवून पुढील तपासात कंपनी व्यवस्थापनाची चाैकशी करून व इतर विभागांकडून माहिती घेवून आवश्यकता वाटल्यास व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती दिली. मात्र,या तपासाला किती वेळ लागू शकताे? हे सांगण्यास नकार दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.