आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षाच्या स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. इगतपुरीतील जिंदाल कंपनीतील 20 तासांपासून धुमसणारी आग अखेर नियंत्रणात आली आहे.
बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जात जखमींची चौकशी केली. या जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इगतपुरीत जात जिंदाल कंपनीतील स्फोटातील जखमींची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देताना जिंदाल कंपनीतील दुर्घटना मोठी असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या घरातील खिडक्यादेखील हादरल्या. या घटनेमुळे आजूबाजूच्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कामगार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले असून केमिकल लिकेज होऊन आग लागल्याची संशय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीनंतर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली. तसेच या आगीच्या घटनेमागील कारणे शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कंपनीत बॉयलर फुटून झालेल्या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये तर जखमींवर शासकीय खर्चात सर्व उपचार करण्यात येतील
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.