आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वादातून हत्या:नाशिकमधील कामटवाडेमध्ये लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून; गुन्हा दाखल करत अटक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना कामटवाडे येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडे येथे मयत सदाशिव दामू निकम (वय 55) व आरोपी त्यांचा भाऊ हरी दामू निकम (वय 50) हे शेजारी राहतात. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास सदाशिव निकम हे घरासमोर रस्त्यावर बडबड करत होते. या वेळी त्यांचा भाऊ हरी निकम हा त्यांच्या जवळ आला व मला शिविगाळ का करतो? या वरून वाद झाल्यानंतर त्याने सदाशिव याच्या लाकडी दांडुका डोक्यात मारला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सदाशिव यांना मयत घोषित केले.

बायडी कैलास सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हरी दामू निकम याच्यावर भादवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत .मयत सदाशिव निकम याच्या पश्यात तीन मुले व दोन मुली परिवार आहे. नाशकातील कामटवाडे परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खराब होऊन आले आहे तसेच निकम कुटुंबातील आपापसातील वादाचे पर्यावरण मारीत खून झाल्याने इतर नातेवाईकांनी सांगतात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.