आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण सरींवर छोट्या खो-खो खेळाडूंच्या उत्साहाची मात:शासकीय कन्या शाळा व जिल्हा परिषद शाळा तोरंगन विजयी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत किशोर गटात 9 संघ तर किशोर गटात 12 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याचे प्रातिनिधिक संघ निवडण्यात येणार आहे.

दोन्ही गटातील सामने हे बाद पद्धतीने खेळविण्यात आले. किशोरी गटात उपांत्य फेरीचा पहिला सामना शासकिय कन्या शाळा व जिल्हा परिषद शाळा तोरंगण या दोन संघात झाला. अपेक्षे प्रमाणे शासकीय कन्या शाळेने जिंकून अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. तर दुसरा सामना जिल्हा परिषद शाळा भोयेगाव व आश्रमशाळा पिंप्री या दोन संघात झाला.

अंतिम फेरीत प्रवेश

जिल्हा परिषद शाळा भोयेगाव या संघाने एकतर्फी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या भोयेगाव शाळेने बाबू शिंगवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम फेरीत प्रवेश करुन जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भोयेगाव संघातील सर्व 15 खेळाडू हे चौथी इयत्तेत शिकणाऱ्या असून त्या सकाळ सायंकाळ सराव करतात. अंतिम फेरीत या छोट्या चनीच्या खेळाडूंना अंतिम फेरीत शासकीय कन्या शाळेकडून पराभव स्वीकारावा लागला.

विजयात मोलाचा वाटा

राष्ट्रीय खेळाडू गीतांजली सावळे हिच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विजेत्या संघाच्या रोहिणी भवर, कौसल्या कहांडोळे, वर्षा सोनवणे, कावेरी खोटरे, रसिका भोये, चंदना कनोजे, चंदना जाधव व मानसी वाल्डे यांनी आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर पराभूत संघाकडून ईश्वरी गलांडे, समीक्षा पगार, वैष्णवी चोपडेव स्नेहल शिंदे यांची चांगली खेळी आपल्या संघाचा पराभव टाळू शकली नाही. किशोरी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या चार संघापैकी तिन संघ हे जिल्हा परिषदेच्या शाळांचे होते.

अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश

किशोर गटात उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात जिल्हा परिषद शाळा तोरांगण व आश्रम शाळा, पिंपरी या दोन संघामध्ये झाला. हा एकतर्फी सामना जिल्हा परिषद शाळा तोरागण या संघाने जिंकला. तर दुसरा सामना आनंद निकेतन व आश्रमशाळा ठानापाडा या दोन संघात झाला. राष्ट्रीय खेळाडू सागर कटारे याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या आश्रमशाळा ठानापाडा संघाने अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला.

संघाचा एकतर्फी पराभव

दत्ता गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या जिल्हा परिषद शाळा तोरांगान या संघाने अपेक्षे प्रमाणे किशोर गटाचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी आश्रमशाळा ठाणापाडा या संघाचा एकतर्फी पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...