आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबनाची कारवाई:नाशिक बाजार समितीत वसुली पावत्यांचा घाेटाळा; कर्मचाऱ्यानेच गहाळ केली पुस्तके

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात प्रसिद्ध असलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता बाजार समितीच्याच एका कर्मचाऱ्याने बाजार सेस वसुली करताना संस्थेला चुना लावल्याचे समोर आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याने वसुली पावत्यांची 13 पुस्तके बाजार घेतली मात्र केवळ ४ पुस्तके बाजार समितीत जमा केली. तर 9 पुस्तके जमाच केली नसुन या रक्कमेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. यामुळे प्रशासक फैय्याज मुलाणी यांनी कर्मचारी एस.व्ही.जाधव यांना निलंबित केले आहे.

जाधव यांची नियुक्ती बाजार समितीने जकात नाक्यावर नियंत्रित शेतमाल, नियमित व्यापाऱ्यांची आवक नोंद घेणे. यादी व्यतिरिक्त व्यापाऱ्यांच्या आलेल्या अनियंत्रित शेतमालाची जागेवर मार्केट फी व शासनाची सुपरव्हीजन फी वसुल करण्याचा यात समावेश हाेता. जाधव यांच्या कामकाजा बाबत तक्रार मिळाल्यानंतर चाैकशी केली गेली. एकाच वेळेला दाेन-दाेन पुस्तके वापरून वसुली केल्याचे चौकशीत निदर्शनास आले. वास्तविक वसुलीसाठी घेतलेले पुस्तक पुर्णपणे संपल्यानंतर ते जमा करूच नवे पावती पुस्तक मिळते. मात्र येथे 13 पुस्तके घेतली तर केवळ 4 जमा केल्याचे स्पष्ट झाले. 9 डिसेंबर 2021 ते 24 मे 2022 या काळात हा सगळा प्रकार घडला आहे.

वसुलीच्या अनधिकृत पावत्याही दिल्या

केवळ 4 पावती पुस्तकांचा भरणा कार्यालयात केला इतर 9 पुस्तके व वसुलीची रक्कम जमा केली नाही, शिवाय शेतमाल वसुलीच्या अनधिकृत पावत्या व्यापाऱ्यांना दिल्या. यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष या चाैकशीतून काढण्यात आला. ही रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे.

सखोल चौकशी होणार का?

याच सारखे प्रकरण पाच वर्षांपुर्वीही समाेर आले हाेते, त्यात, संबंधित कर्मचाऱ्याकडून रक्कम वसुल करून घेत बडतर्फीची कारवाई झाली. समाेर आलेले हे प्रकरण त्यापेक्षाही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. बाजार समितीने एक पुस्तक संपल्याशिवाय दुसरे पुस्तक दिलेच कसे?, यामागे नेमके कुणाचे संरक्षण या कर्मचाऱ्यांना मिळत होते? याची चाैकशी झाल्यास अनेक गंभीर बाबी समाेर येतील असे कर्मचाऱ्यांतूनच बाेलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...