आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा विभागांतर्गत आंतर महाविद्यालयीन आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयात आयाेजन करण्यात आाले हाेते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे व चिटणीस दिलीप दळवी उपस्थित होते.
अॅड. ठाकरे यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळाची आवश्यकता आहे. धनुर्विद्या खेळामुळे अचूकता, नियंत्रण, लक्ष केंद्रित करणे, शारीरिक क्षमता आणि दृढनिश्चय यांचा विकास होतो. ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेकदा स्थिर असताना धनुर्विद्या ही शरीर सक्रिय ठेवून कॅलरीज जाळते. मानसिक स्थिती चांगली ठेवते. यश अपशयाचा विचार न करता स्पर्धेला सामाेरे जावे असे सांगत निवड चाचणी स्पर्धेत सहभागी खेळांडूचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
50 हून अधिक खेळाडूंचा सहभाग
यावेळी महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरव लांबे याचाही उल्लेख करण्यात आला. प्रावीण्यप्राप्त धनुर्विद्या खेळाडूंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात 50 हुन अधिक खेळाडू यात सहभागी झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने आर्चरीबाबतही खेळांडूना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास मविप्र संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, रवींद्र देवरे, अॅड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शोभा भागवत, शालन सोनवणे, सेवक संचालक चंद्रजित शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड उपस्थित होते.
पुणे विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय आंतर विद्यापीठासाठी के. टी.एच.एम.महाविद्यालयाचे गौरव लांबे, साहिल पवार ,आदिनाथ शिर्के, कावेरी पाटील, वैष्णवी भागवत, नक्षत्रा खोडे यांची यावेळी निवड करण्यात आली. स्पर्धे साठी , प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड, जिमखाना प्रमुख-प्रा.सोपान जाधव, प्रा कैलास लवांड,बाळासाहेब शिंदे, अविनाश कदम, उद्धव डेर्ले, आर्चरी प्रशिक्षक मोहन कसबे तसेच सुभाष उकाडे, स्वप्नील पडोळे , विलास लोखंडे, दौलत बेंडकोळी यांनी परिश्रम घेतले .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.