आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमधून एक बातमी समोर आली आहे. पक्षघाताचा तीव्र झटका बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ओझर येथे घडली होती. अशातच मृताच्या कुटूंबियांनी तरुणाचे अवयवदान करून दोन जणांचे प्राण वाचवले आहे. मृत तरुण हा एका खासगी कंपनीत कामाला होता.
काय आहे प्रकरण?
ओझर मिग येथे राहणाऱ्या सुशिक्षीत, मध्यमवर्गीय कुटूंबियातील या 49 वर्ष वयाच्या तरुणाचे हात, पाय जड पडल्याने नजीकच्या रूग्णालयात दाखल केले. तिथे तपासून त्यास अपाेलाे रूग्णालयात हलविण्यात आले. या कामगारास मधूमेह, रक्तदाबाची पार्श्वभूमी हाेती. मेंदूराेग विकार तंज्ञ डाॅ. जितेंद्र शुक्ल यांनी एमआरआय चाचणी केल्यावर त्यात मेंदूच्या उजव्या भागात मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा खंडित होऊन काही प्रमाणात रक्तस्त्राव देखील झाला होता. मेंदूची सूज वाढून छोट्या मेंदूचे कार्य पूर्णपणे थांबले होते. यासंदर्भात, डाॅ. शुक्ला व अवयव प्रत्याराेपण समन्वयक चारूशीला जाधव यांनी रूग्णांच्या नातलगांना अवयवदानाचे महत्व सांगितले. संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या आठ अवयवांचे दान करून गरजूंना पुर्नजीवन मिळू शकते, हे पटवून देण्यात आले. त्यानुसार तरुणाची पत्नी, माेठा भाऊ, बहिण, भाच्यांनी त्यास संमती दिली. पुढील सहा ते आठ तासात मेंदूमृत व्यक्तीचे यकृत पुण्याच्या सह्याद्री हाॅस्पीटलमधील रूग्णास तर डाेळे नाशिकच्या श्रीगुरूजी रूग्णालयातील रूग्णासाठी प्रत्याराेपण करण्यात आले. या प्रक्रियेत आयसीयूचे डाॅ. अमाेल खाेलमकर, डाॅ. अतुल सांगळे, डाॅ. राहूल भामरे यांची भूमिका माेलाची ठरली.
दु:ख सारून अवयवदानाला संमती
कुटूंबप्रमुखाचे निधन झाल्याने पत्नीसह कुटूंबियांना जाेरदार धक्का बसला. अचानक पतीचे छत्र हरपून दाेघा मुलांचा शिक्षणाचा संसाराचा प्रश्न डाेळ्यासमाेर उभा असताना डाॅक्टरांनी अवयवदानाचे महत्व सांगताच ते आपल्यात नसले तरी त्यांच्या अवयवाने ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात रूग्णाच्या पत्नीने भावना व्यक्त केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.