आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकचे कवी शरद अमृतकर लिखित सोबत काय येते, या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. अभियंतानगर, कामटवाडे, सिडको परिसर येथे आयोजित या अशा प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कवी विलास पंचभाई, प्रसिद्ध गजलकार अजय बिरारी, प कवी संजय गोराडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पुंडलिक वाघ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विलास पंचभाई म्हणाले की, मराठी साहित्य क्षेत्रात नवनवीन लेखक कवी लिहीत आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शरद अमृतकर यांचे यापुर्वी गोधडी आणि मना गावनी माटी असे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अनेक कवितेतून संवेदनशील मनाची जाणीव होते, असेही पंचभाई यांनी सांगितले.
पुंडलिक वाघ म्हणाले की, काव्य करण्यात शरद अमृतकर यांचा हातखंड आहे त्यांना विषय शोधायची गरज पडत नाही, विषयच त्यांच्याकडे समोर येऊन उभा राहतो. यावेळी प्रसिद्ध कवी संजय गोराडे यांनी शरद अमृतकर यांना आपल्या मनोगत शुभेच्छा दिल्या. तसेच अजय बिरारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कवी शरद वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सोबत काय येते हा माझा तिसरा काव्यसंग्रह असून माणूस जन्माला येण्यापासून मरेपर्यंत नुसती धावपळ करत राहतो. सोबत काही येत नाही म्हणून जनसेवा करून देहाचे चंदन करावे, असे मला वाटते. या काव्यसंग्रहातील कविता वाचकांना निश्चितच आवडतील असेही त्यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सोबत का येते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सूत्रसंचालन खगेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास संजय देव, किशोर अमृतकर, माधुरी दहिवड, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मोहोकर, पंडित अमृतकर, शकुंतला अमृतकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.