आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला:नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड कारागृह पूर्वी मोबाईल, गांजा, तंबाखू अशा विविध प्रकारामुळे राज्यभरात गाजलेले आहे. आता पुन्हा पोलिस कर्मचाऱ्यावर काही त्यांनी जीवघेणा हल्ला करून वादाची परंपरा नाशिक कारागृह आणि कायम ठेवले आहे.

विशेष करून बंदीवानांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्तीची विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मध्य विभाग औरंगाबाद येथून कारागृह उप महानिरीक्षक योगेश देसाई येत असून त्यांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्याने येथील पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. देसाई याबाबत काय निर्णय घेता याच्याकडे कारागृह कर्मचाऱ्यांचेही लक्ष लागून आहे.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे बुधवारी सायंकाळच्या दरम्यान पुणे येथून आलेले बंदीवान आणि कारागृह कर्मचारी प्रभूचरण पाटील यांच्यात बाचाबाची झाली. ह्या बाचाबाची चे रूपांतर बंदीवानांनी थेट हल्ल्यात रूपांतर केल्याने पाटील हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

गुन्हा दाखल नाही

बुधवारी रात्री घडलेला प्रकार गंभीर नसून किरकोळ बाचाबाची घडली आहे. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून त्याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे कारागृहनिरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

पुण्यातील आरोपीची चौकशी सुरू

पुणे येथील येरवडा कारागृहातून सुमारे महिनाभरापूर्वी दहा ते बारा बंदिवान हे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते, याच बंदिवानांनी हल्ला केले की नाही त्याची चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...