आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन निवडणूक:अध्यक्षपदी विश्वास ठाकूर, उपाध्यक्षपदी वसंतराव घुईखेडकर यांची निवड

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या पंचवार्षिक निवडणूक 2022-2027 साठी विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनल’ने 21 पैकी 18 जागा जिंकून अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूक दणदणीत विजय मिळवला आहे.

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या कार्यालयात आज झालेल्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘अध्यक्ष’ पदी विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिकचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची तर ‘उपाध्यक्ष’ पदी दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.चे वसंतराव घुईखेडकर (यवतमाळ) यांची एकमताने निवड झाली.

यापूर्वी विश्वास ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील विविध समित्यांवर यशस्वीपणे काम केले असून सहकारातील आधुनिक बदलांसाठी, सुधारणांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सहकारातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. भारतातील मोजक्याच सहकार नेतृत्वात त्यांचा नामोल्लेख केला जातो. माजी संचालक-नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप.बँक्स अ‍ॅन्ड क्रेडीट सोसायटीज् लि. (नॅफकब, दिल्ली), अध्यक्ष-नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असो.मर्या. नाशिक, माजी विशेष निमंत्रित-दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई, युनो (दि युनायटेड नेशन्स जनरल अ‍ॅसेंब्ली)ने 2012 हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या कृषी व सहकार विभागाने एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीत संपूर्ण देशातून एकमेव अशासकीय सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या बँकिंग रेग्युलेशन कायदा सुधारणा समितीवरही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने सहकारी धोरणांचा आढावा घेणार्‍या सुखठणकर समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नागरी सहकारी बँकांच्या विविध कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी स्टडी ग्रुप या समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विचारमंच सभेत सदस्य म्हणून कार्य., यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), महाराष्ट्र शासन, पुणे येथे मा. महासंचालक यांनी सहकार विचार मंचच्या सभेवर त्यांची सदस्य’ म्हणून नियुक्ती केली होती.

शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 जानेवारी 2011 रोजी नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद संपन्न झाली. मा. विश्वास ठाकूर हे परिषदेचे निमंत्रक होते. यात महाराष्ट्रातून सुमारे 2500 हून अधिक नागरी सहकारी बँकांचे चेअरमन, संचालक यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...