आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गो ग्रीन’ची सेवा:नाशकात तीन महिलांनी सुरू केली पहिली इलेक्ट्रिक कॅब सेवा; अ‍ॅपवरून बुकिंग, भाडेही असेल 25% कमी

प्रतिनिधी | नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदूषण रोखण्यासाठी नाशकात तीन महिलांनी पुढाकार घेत शहरात पहिली ‘गो ग्रीन’ इलेक्ट्रिक कॅब सेवा सुरू केली आहे. याचे भाडेही किमान २५% कमी असेल. विशेष म्हणजे यात महिला चालकांना प्राधान्य राहील. बुकिंगही अॅपद्वारे करता येणार असून ग्राहकांना प्रत्यक्षात ही सेवा १० डिसेंबरपासून मिळणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या सेवेचे उद‌्घाटन रविवारी झाले.

हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या यांनी ही सेवा सुरू केली असून श्रमिक शहा, मोहित भाटिया, अनुप मढय्या यांच्याकडून तांत्रिक सहकार्य मिळाले. तूर्तास २० कार असून पुढील वर्षात ५० कार असतील. यात मोबाइल चार्जिंगसह सर्व सुविधा असतील. मुंबई नाका परिसरात स्वत:चे चार्जिंग स्टेशन असेल. नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘गो ग्रीन’च्या वतीने संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना संमेलनस्थळी जाण्यासाठी कॅबद्वारे मोफत प्रवासाची सेवा दिली जाणार आहे.

महिलांकडून महिलांसाठी प्राधान्य असलेला उपक्रम
‘गो ग्रीन’चे महिलांना प्राधान्य असून आमच्याकडे बहुतांश ड्रायव्हर महिलाच असतील. इतर कॅब सेवांच्या तुलनेत किमान २५ टक्के स्वस्त, आरामदायी सेवा असेल. नाशिक विमानतळावर पिकअप ड्रॉपसाठी प्राधान्य दिले जाईल. -हिना शहा, संचालिका, गो ग्रीन

बातम्या आणखी आहेत...