आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीत होरपळणाऱ्या बापाने मुलांना वाचवले:लेकरांना फुलासारख जपणाऱ्या वडिलांचा त्यांच्यासमोरच अंत, काळिज पिळवटून टाकणारी घटना

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅरेजमध्ये काम करताना थिनरने पेट घेतला. यावेळी स्वतः जळत असतानाही आपली मुले जवळ येत असल्याचे पाहून जळणाऱ्या व्यक्तीने त्यांना वाचवण्यासाठी धडपड केली. स्वतः जळत असतानाही त्याला आपल्या मुलांचीच काळजी होती. कारण तो एक बाप होता. आपल्या मुलांना फुलासारख जपणारा बाप अखेर हे जग सोडून गेला. मात्र मुलांवर त्याने संकट येऊ दिले नाही.

अंबड परिसरात राहणारे कृष्णा राजकुमार विश्वकर्मा 1 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे आपल्या विश्वकर्मा मोटर्स या गॅरेजमध्ये रात्रीच्या वेळी काम करत होते. लाईट गेल्याने त्यांनी मेणबत्ती पेटवून काम सुरू केले. पण याचवेळी मेणबत्ती अचानक खाली पडली. त्यामध्ये खाली पडलेल्या थिनरने पेट घेतला. त्याच वेळी गॅरेजमध्ये कृष्णा यांची दोन्ही मुले होती.

कृष्णा यांच्या कपड्यांना आग लागताच मुले जवळ येत होती. मात्र कृष्णा त्यांना बाजूला ढकलत राहिले. मुलांनो माझ्या जवळ येऊ नका म्हणून ओरडत राहिले. कृष्णा यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकं गोळा झाले. कृष्णा यांना लागलेली आग विझवण्यात आली.

त्यांना तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी यानंतर अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...