आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik | Marathwada | Marathwada | Nashik Gangapur Dam | Marathi News | 1100 Cu. Of Water Released From Nashik's Darna Dam For Rabbis In Marathwada

विसर्ग सुरू:मराठवाड्यातील रब्बीसाठी नाशिकच्या दारणा धरणातून सोडले 1100 क्यु.पाणी

घोटी (नाशिक)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर धरण समूहातील दारणा व मुकणे धरणांतून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी यंदाच्या रब्बी हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाने नांदूर-मधमेश्वर प्रकल्पांतर्गत सोडले आहे. रब्बी हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सकाळी ११ वाजता ११०० क्युसेक, तर मुकणे धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला आहे.

दारणा धरणाचे पाणी वैजापूर कालव्यासाठी, तर मुकणे धरणाचे पाणी कोपरगाव, राहाता या दोन्ही कालव्यांसाठी २१ दिवस सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोटेशन टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुकणे धरणाचे शाखाधिकारी विजय ठाकूर यांनी दिली.

पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात गेल्या पावसाळ्यात सरासरीच्या दीडपट अधिक पाऊस झाला होता. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागले. दुसरीकडे तालुक्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरून पाण्याचा मुबलक साठा तयार झाला. धरणांच्या साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक पाणी दारणा, मुकणे, कडवा, भाम, भावली, वाकी-खापरी या धरणांतून खाली सोडून देण्यात आले होते. त्यामुळे नांदूर मधमेश्वर आणि जायकवाडी धरण प्रकल्पात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

२१ दिवसांच्या रोटेशनमध्ये मागणीनुसार वाढ करणार
यंदा नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात मुबलक पर्जन्यमान झाल्याने जायकवाडीसह इतरही प्रकल्प क्षमतेने भरले आहेत. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी नसल्याने हंगामातील आवर्तन उशिरा सोडण्यात आले. -सुरेश जाचक, शाखाधिकारी, दारणा धरण समूह

बातम्या आणखी आहेत...