आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) च्या औद्याेगिक क्षेत्रामधील 5 हजार चाैरस मिटर क्षेत्रफळापर्यंतच्या भुखंडाचे तसेच एमएसएमइ उद्याेजकांना 2500 चाैरस मिटर पर्यंतच्या भुखंडांचे वाटप करण्याचे अधिकार आता एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील भुखंड वाटप समितीला देण्यात आले आहे. यामुळे भुखंड वाटपाच्या बहुतांश प्रकरणांत स्थानिक पातळीवरच निर्णय शक्य हाेणार असून उद्याेजकांना नवा उद्याेग उभारणे किंवा उद्याेग विस्तार करणे साेपे हाेणार आहे.
एमआयडीसीचे भुखंड, गाळा, शेड यांचे वाटप, हस्तांतरण आणि इतर प्राप्त प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रादेशिक अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावरील भुखंड वाटप समित्यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या अधिकारांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर आता एमआयडीसीने त्यात बदल केले आहेत. यानुसार आता अनेक अधिकार प्रादेशिक अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत.
या प्रकरणांत प्रादेशिक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अधिकार -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.