आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा आक्रमक पावित्रा:3 कोटीच्या थकबाकी वसुलीसाठी पालिकेच्या 1 हजाराहून अधिक गाळेधारकांना नोटीसा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

करवसुलीसाठी आता महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून घरपट्टी पाणीपट्टी पाठोपाठ ६२ व्यापारी संकुलातील २९४४ गाळेधारकांना थकबाकी वसुलीसाठी नोटिसा दिल्या जाणार आहे. यातील साधारण ५० टक्के गाळेधारक थकबाकीदार असून, त्यांच्याकडून दोन कोटी ९८ लाख रुपयांची वसुली होणे अपेक्षित आहे. दरम्यान, थकबाकीदारांना नोटीस देणे, वसुली न केल्यास गाडी जप्त करणे अशी कारवाई मार्च महिन्यापर्यंत केली जाणार आहे. त्यासाठी शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सहाही नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवले जाणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या ६२ इमारतीमध्ये जवळपास २९४४ गाळेधारक असून त्यातील ५६ व्यापारी संकुलातील १७३१ गाळ्यांची मुदत २०१४ व २०१५ मध्ये संपुष्यात आल्याने या गाळ्यांच्या फेरलिलावाचा प्रस्ताव तत्कालिन आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. १४ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या महासभेत हा प्रस्ताव फेटाळून लावत गाळेधारकांना १५ वर्षांची मुदतवाढ देण्याचा व शासकीय मूल्यांकन दरानुसार त्यांच्याकडून भाडेवसुलीचा निर्णय घेण्यात आला होता.

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यापासून गाळेधारकांनी महापालिकेचे भाडे भरलले नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत असून महापालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षी सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समिती बैठकीत वादातीत कालावधीतील भाडेवसुली कोणत्या दराने करायची याचा निर्णय जिल्हा न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच घेण्याचे ठरले.

अशा नानाविध कारणांमुळे थकबाकीचा आकडा वाढत असून महापालिकेने आता मार्चपासून कर वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. विविध कर विभागाने आता सुमारे एक हजाराहुन अधिक गाळेधारकांना थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यानुसार थकबाकी भरण्यासाठी सहाही विभागामधील नागरी सुविधा केंद्र शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. त्याबरोबरच थकबाकी न भरणाऱ्यांची गाळे जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

या विभागात दीड कोटींची थकबाकी

महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलपैकी नासिक पश्चिम विभागामधील कॉलेज रोड, शरणपूर रोड, गंगापूर रोड आनंदवली या भागामध्ये प्रचंड महत्त्व आहे. या भागामध्ये रेडीरेकनरचा दर अधिक असल्यामुळे येथील गाळ्यांनाही चांगली मागणी आहे. नासिक पश्चिम विभागातील कोटी ५५ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी येणे असून त्या खालोखाल पंचवटीमध्ये ३६ लाख ३२ हजार, सातपूरमध्ये ३० लाख २९ हजार, नाशिक रोड मध्ये ३० लाख ४९ हजार तर नाशिक पूर्व विभागात ४२ लाख रुपये येणे बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...