आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक महापालीका क्षेत्रात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सुमारे ७० रूग्णालय, प्रसूतीगृह नर्सिंग हाेमला वारंवार सूचनापत्र दिल्यानंतरही मुंबई सुश्रुषा अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ अन्वये वैद्यकीय विभागाकडे नोंदणी वा नूतनीकरण होत नसल्यामुळे पालिकेने नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रामुख्याने परिचारिकांची नोंदणी प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला आदी कारणास्तव नोंदणीमध्ये बाधा येत असल्याचे सूत्रांचे मान्य आहे. मुंबई शुश्रुषागृहे अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ अन्वये महानगरपालिका कार्यक्षत्रातील रुग्णालय, प्रसुतिगृहे, नर्सिग होमला वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
दवाखान्यांकडून नोंदणी नाही
महापालीकेने वेळाेवेळी अावाहन केल्यानंतरही अनेक दवाखान्यांकडून नोंदणी होताना दिसत नाही. नोंदणी करण्यात प्रमुख अडचण म्हणजे, अग्निशामक दलाचा ना हरकत दाखला, जादा बांधकामामुळे नगररचना विभागाकडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळण अशा आहेत.
२०१८ मध्ये तत्कालीन अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात त्यांनी टाेकाची भुमिका घेत मुंबई शुश्रुषागृहे अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ व २०१३ नुसार ज्या खासगी रुग्णालयांनी नोंदणी केलेली नाही तर थेट रुग्णालयांना टाळे ठाेकणे व फाैजदारी कारवाईचा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रचंड वादंग झाले होते.
प्रमाणपत्र मिळवणे दिव्य
कालांतराने त्यात शासनाने हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण निवळले मात्र अाता जवळपास चार वर्षानंतरही रुग्णालयांना नोंदणी प्रमाणपत्र मिळवताना अनेक दिव्याचा सामना करावा लागत अाहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात अनेक परिचारिकांची नोंदणी संपुष्टात आली.
आता त्यांना नवीन नोंदणी आवश्यक असून ही नोंदणी होत नसल्यामुळे त्याचे प्रमाणपत्र रुग्णालय नोंदणीसाठी सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला अाणण्याची बाब डाेकेदुखी आहे. शिवाय अनेकांनी नगररचना विभाग, अग्निशामक विभाग, इलेक्ट्रिक अाॅडिट असे अहवाल वा दाखले मिळालेले नाही.
ही बाब लक्षात घेत ७० रूग्णालयाना आवश्यक अर्ज करून सात दिवसांत कागदपत्रे द्या अन्यथा नोंदणी प्रक्रिया रद्द केली जाईल असा इशारा देण्यात अाला अाहे.
कागदपत्रे सादर करण्याची नोटीस
७ दिवसांत कागदपत्रे सादर करा ६३८ रुग्णालयांची नोंदणी अपेक्षित असून त्यापैकी ५६८ रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. ७० रुग्णालयांची नोंदणी बाकी असल्यामुळे सात दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस त्यांना दिली आहे. - डॉ. प्रशांत शेटे, सहायक वैद्यकीय अधिकारी
अावाहनाला प्रतिसाद नाहीच
महापालिकेच्या अाराेग्य विभागाकडून नियमीत नूतनीकरण करून घेण्यास खासगी रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याने व मनपा प्रशासनाच्या नाेटिसांना गांभीर्याने न घेतल्याचा सामान्य रुग्णांनाही फटका बसताेय. यातील बहुतांशी खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल हाेणाऱ्या रुग्णांचा वैद्यकीय विमादेखील मंजूर होत नसल्याने अडचणी निर्माण होत अाहे.
रुग्णांचा कॅशलेसची सुविधा असतानाही रुग्णालयाचे नूतनीकरण न झाल्याने विमा कंपन्यांकडून क्लेम मंजूर होत नाही. विमा कंपन्याना रुग्णांचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी रुग्णालयाचे मनपा प्रशासनाचे नूतनीकरणाचा दाखल अावश्यक असताे. त्याचबराेबर इतर परवानग्या नसल्याने देखील अडथळे निर्माण हाते अाहे. खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापाने वेळीच महापालिकेकडून देण्यात अालेल्या नाेटिसांना उत्तर देत त्यांची कागदपत्रे सादर करून वेळीच नूतनीकरण करून घेतल्यास अशा समस्यांना सामारे जावे लागणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.