आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ जागांच्या भरतीसाठी पालिकेने प्रक्रिया गतिमान केली असून एका पदासाठी टीसीएस कंपनी ६७५ रुपये आर्थिक मोबदला घेणार आहे.
नोकरभरतीसाठी सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटचे काम सुरू झाले असून जुलैमध्ये प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कोणती पदे रिक्त?
महापालिकेत ‘क'' वर्ग आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील मंजूर ७०८२ पदांपैकी २८०० पदे रिक्त आहेत. मध्यंतरी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे नोकरभरतीत अडचणी होत्या.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाल्याने टिसीएसकडून भरतीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम सुरू झाले असून प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान, एका उमेदवारासाठी कमीत कमी ४९५ ते जास्तीत जास्त ६७५ रुपये आकारले जाणार आहेत.
..तर हाेईल शुल्क कपात
प्रक्रियेत १० हजारापर्यंत उमेदवार आले तर, एका उमेदवारासाठी ६७५ रुपये, १० हजार ते ५० हजारा दरम्यान उमेदवार आले तर, एका उमेदवारासाठी ६०० रुपये, ५० हजार ते एक लाखापर्यंत उमेदवार आले तर, प्रति उमेदवार ५७५, एक ते दोन लाखांपर्यंत ५५०, दोन लाख ते पाच लाखापर्यत उमेदवार आल्यास प्रति उमेदवार ४७५ रुपये मोबदला द्यावा लागणार आहे. उमेदवार शुल्क घेण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडले जाणार असून त्यावर पालिकेचे नियंत्रण राहणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.