आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक मनपा प्रभागरचेनेचा फटका:आरक्षण सोडतीनंतर काही जणांचा हिरमोड, प्रभाग राखीव झाल्याने नगरसेवकांकडून नव्या प्रभागाची शोधाशोध

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांसह काही दिग्गजांना फटका बसला आहे. यात अपेक्षेप्रमाणे संतोष गायकवाड, योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, दीक्षा लोंढे यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल.

अनेकांना बसणार फटका

सातपूर विभागात प्रभाग क्रमांक 11,12 ,13,14,15, व 34 या प्रभागांचा समावेश आहे. नव्याने जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांचे सहकारी नगरसेवक संतोष गायकवाड यांची मात्र अडचण निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील किंवा त्यांचे पुत्र अमोल पाटील व दिनकर पाटील यांच्या पत्नी माजी नगरसेविका लता पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर त्यांचे सहकारी नगरसेवक रवींद्र धिवरे यांना मात्र फटका बसला आहे. त्यांना महिला उमेदवार द्यावा लागणार आहे.

कही खुशी कही गम

प्रभाग क्रमांक 13 मध्ये माजी नगरसेवक दिनकर पाटील किंवा त्यांचे पुत्र अमोल पाटील यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुबाई नागरे हे निवडणूक लढवू शकता. तसेच भाजपतून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविका हेमलता कांडेकर यांचाही मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग क्रमांक 14 व 15 मध्ये माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यांचे सहकारी नगरसेवक योगेश शेवरे यांची अडचण झाली आहे. त्यांना दुसऱ्या प्रभागात उडी घ्यावी लागणार आहे. याच प्रभागात माजी नगरसेवक शशिकांत जाधव, पल्लवी पाटील यांचाही मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणामुळे माजी नगरसेविका सीमा निगळ यांचे पती गोकुळ निगळ या प्रभागातून निवडणूक लढवू शकता. तर माजी नगरसेवक नंदू जाधव यांच्या कुटुंबियांतून उमेदवार निवडणूक रिंगणात येऊ शकतो.

तिकीटासाठी ईच्छुकात चुरस

प्रभाग क्रमांक 15 मध्ये रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे हे आपल्या सुनबाई तथा माजी नगरसेविका दिक्षा लोंढे यांना सर्व साधारण महिला जागेवर सोबत घेऊन निवडणूक लढवू शकता. याच प्रभागात माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह सीमा निगळ यांचे पती गोकुळ निगळ निवडणूक लढवू शकता. शेवटी योग्य प्रभाग बघूनच शेख आणि निगळ निर्णय घेतील. प्रभाग क्रमांक 34 मध्ये माजी नगरसेवक भागवत आरोटे व मधुकर जाधव यांच्यात तिकिटासाठी चुरस निर्माण होणार आहे. तर त्यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या दोन जागेसाठी महिलांचा शोध घ्यावा लागणार आहे. याच प्रभागात माजी नगरसेवक योगेश शेवरे हे अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर त्यांच्या पत्नीला उभे करून ते स्वतः दुसऱ्या प्रभागातून सर्व साधारण जागेवर लढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...