आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पालिकेत नोकर भरती:नवीन वर्षात 706 पदांसाठी होणार भरती; आयबीपीपीएस कंपनीची नियुक्ती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल 24 वर्षानंतर नाशिक महापालिकेत अग्निशमन विभागातील 348 तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील 358 अशा एकूण 706 पदांसाठीच्या भरतीचा बिगुल वाजणार असून आयबीपीपीएस या कंपन्यांनी संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी तयारी दर्शवल्यामुळे आता ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी महिन्यामध्ये नोकर भरती करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये स्थानिकांना महापालिकेच्या माध्यमातून कायमस्वरूपी चा रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

नोकर भरतीसाठी आवश्यक सेवा प्रवेश नियमावली 2017 पासून राज्याच्या नगर विकास खात्याकडे पडून होती तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पाठपुरावा केल्यानंतर सुधारीत आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील 875 नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती. त्यातील अग्निशमन विभागातील 348 पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील 358 अशा 706 पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्यशासनाने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी यासंदर्भातील निर्देश दिले नव्हते.त्यानंतर सरकारने

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब , क ड, या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरतांना स्पर्धा परिक्षा प्रक्रिया टिसीएस( टाटा कन्सल्टींग सर्विसेस),आयबीपीपीएस ( इन्टिस्टिट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन ) या कंपनीमार्फत राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांशी महापालिकेने पत्रव्यवहार करून भरतीसाठी सविस्तर प्रस्ताव मागवले होते. त्यापैकी आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे.

तर दोन हजार पदांसाठी होणार भरती..

सध्यस्थितीत आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील 706 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असून उर्वरीत दोन हजार पदांसाठीचीही प्रलंबित असलेली सेवा प्रवेश नियमावली मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया होईल. ही नियमावली मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला आदेश दिले.

असे आहेत आकडे

महापालिकेत ‘क’ वर्ग संवगार्तील मंजूर पदांची संख्या 7082 इतकी असताना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या 2600 वर गेली आहे. पालिकेत सद्यस्थितीत जेमतेम 4500 अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला आहे.

आयबीपीएसमार्फत भरती

प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील म्हणाले की, अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला असून यामार्फतच भरती प्रक्रिया राबविली जाईल. साधारण जानेवारी महिन्यात प्रक्रिया सुरू करू-

बातम्या आणखी आहेत...