आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा उलगडा:कापडणीस दुहेरी हत्याकांड; ठाण्याच्या खाडीत फेकला नानासाहेबांचा मोबाइल, लॅपटॉप जप्त

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब बच्छाव आणि त्यांचा मुलगा डाॅ. अमित बच्छाव यांची मालमत्ता हडप करण्यासाठी निर्घृण खूनप्रकरणी अटक असलेला संशयित राहुल गौतम जगताप याच्याकडून खून कसा केला याचा तपासात उलगडा झाला असून, पोलिसांनी संशयितांकडून क्राइम सीन केल्यानंतर अत्यंत शांत डोक्याने दोन्ही खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खुन केल्यानंतर शेअर्सचे पैसे खात्यात वर्ग केल्यानंतर नानासाहेबांचा मोबाईल त्याने ठाण्याच्या खाडीत फेकल्याची कबूली दिली. पथकाने ठाण्याच्या खाडीत शोध घेतला मात्र मोबाईल मिळून आला नाही. संशयिताची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवार दि. २५ रोजी संपत आहे.

कापडणीस पिता-पुत्र दाेघेही मिसिंग असल्याची तक्रार २८ जानेवारीला मुलीने पोलिसांत दिली होती. या मिसिंग प्रकरणात बँक खात्याची माहिती घेतली असता शेअर्स विक्रीचे ९० लाख रुपये संशयित आरोपी राहुल गौतम जगताप याच्या खात्यात वर्ग झाल्याने पोलिसांच्या तपासात या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला राहुल जगताप यास अटक केली तो दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. या दहा दिवसांत पथकाने कापडणीस यांना ज्या ठिकाणी मारले त्या ठिकाणावर संशयित राहुल कडून क्राईम सिन उभा केला. नानासाहेब यांना सुरुवातीला डोक्यात मारत बेशुद्ध केले. पाणी मारत शुद्धीवर आणले त्यानंतर माफी मागून संशयिताने नानासाहेब यांचा गाडीत गळा आवळून खून केला. मृतदेह मोखाडा शिवारात फेकून दिला.

मात्र कपड्यांवरुन ओळख पटू नये म्हणून संशयिताने अंगावरील सर्व कपडे काढून मृतदेह दरीत फेकला. गवताला आग लवात मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न केला. मोखाडा पोलिसांना नग्न अवस्थेत अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. अशाच प्रकारे डाॅ. अमित यास त्र्यंबकेश्वर येथे नेऊन मद्य पाजले. घाटत नेऊन पाठीमागून डोक्यात दगड मारत जखमी केले. मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर कारमध्ये मृतदेह टाकून राजुर शिवारात नेला. कपडे काढून मृतदेह जाळला. कपडे नदीत फेकून दिले. फ्लॅटची चावी तपोवनात फेकली. अत्यंत शांत डोक्याने खुन केल्यानंतर सर्व पुरावे पुरावे नष्ट केले. पथकाने या गुन्ह्याचा क्राईम सिन करुन घेतला. तसेच नानासाहेब यांचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे तपास करत आहे.

राहुल वर फसवणूकीचा गुन्हा
संशयित राहुल जगताप याच्यावर पूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...