आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखुन करुन अपघात झाल्याचा बनाव रचून विम्याचे 4 कोटी रुपये हडप केल्याच्या प्रकरणात संशयितांनी मृत अशोक भालेराव याचा खुन केल्याची कबूली दिली आहे. नियोजनबद्ध कट रचून मुंबईहून आल्यानंतर पायी जात असतांना संशयितांनी बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवत डोक्यात लोखंडी राॅडने हल्ला केला रस्त्यावर पडल्यानंतर अंगावरुन गाडी घालून खून केल्याचे संशयितांनी पोलिस कोठडीत सांगीतले. मृत अशोक भालेराव हा कटात सहभागी असल्याने तो रात्री संशयितांच्या संपर्कात असल्याने अलगद जाळ्यात फसला आणि मारला गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात मुख्य संशयित मंगेश सावकार याने फिल्मि स्टाईल प्लाॅन करत मित्रांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. भालेराव याच्या नावे विविध कंपनीच्या डेथ क्लेमच्या पाॅलिस काढून त्याच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीचा अपघात करुन मयत दाखवत वारस लावलेल्या महिलेला विम्याची रक्कम देण्याचा कट रचला होता. मात्र अनोळखी इसम मिळत नसल्याने अशोकचा खून केला तर 4 कोटी 10 लाख विमा क्लेम करुन ही रक्कम अपापसात वाटून घेण्याचे ठरले होते. संशयित मंगेश सावकार, रजनी उके, दिपक भारुडकर, किरण शिरसाट, हेमंत वाघ, प्रणव साळी हे पोलिस कोठडीत आहे.
असा आखला प्लॅन
संशयित मंगेश सावकार हा विविध विमा कंपनीमध्ये डेथ क्लेमचे कामे करत असल्याने एखाद्या विमा धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर किती विमा रक्कम मिळते याची पुर्ण कल्पना असल्याने संशयिताने हा प्लान आखला होता. अशोक भालेराव मित्र असल्याने त्याला कटाची कल्पना दिली होती. लाईफ सेट होईल या दृष्टीकोणातून मयत भालेराव या कटात सहभागी झाला होता.
महिलेला बनवले वारसदार
संशयित सावकार याने संशयित रजनी उके या महिलेला अशोक भालेराव याची पत्नी दाखवत तिला विमा पाॅलिसीला वारस लावले. याकरीता नाव बदलाचे शासकीय गॅजेटही प्रसिद्ध केले होते. या गॅजेटच्या अधारे अधिकृत एकमेव वारस असल्याचे भासवत विम्याचे 4 कोटी 10 लाख रुपयांचा क्लेम पास केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.