आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Murder Father And Son | Murder News Nashik | Marathi News | Murder Of Doctor's Son Along With Former Registrar Of Nashik Open University; The Bodies Were Taken To The District To Destroy The Evidence

धक्कादायक:नाशकात मुक्त विद्यापीठाच्या माजी कुलसचिवासह डॉक्टर मुलाचा खून; पुरावे नष्ट करण्यासाठी परजिल्ह्यात नेऊन टाकले मृतदेह

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२८ जानेवारीपासून बेपत्ता असलेले मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (७०) आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित (३५) यांचा मालमत्ता हडप करण्यासाठी खून झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. नानासाहेब यांच्या पत्नीने १८ जानेवारी रोजी याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेतली तेव्हा शेअर्स विक्रीचे ९० लाख रुपये संशयित आरोपी राहुल गौतम जगताप याच्या खात्यात वर्ग झाल्याचे दिसले आणि गुन्हा उघडकीस आला.

जगताप याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कापडणीस यांची पत्नी आणि मुलगी पवई मुंबई येथे राहत. पंडित कॉलनी येथे नानासाहेब व अमित राहत होते. रहिवाशांशी ते फारसे संपर्कात नव्हते. याच इमारतीमध्ये राहणारा राहुल याने अमितसोबत ओळख वाढवली. बिअरची चटक लावत डाव साधला.

पुरावे नष्ट करण्यासाठी परजिल्ह्याच्या हद्दीत नेऊन टाकले दोन्ही मृतदेह
संशयित राहुल याने नानासाहेब यांचा खून करून त्यांचा मृतदेह मोखाडा येथे गोंदे गावात निर्जन स्थळी टाकला. ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर स्पिरिट टाकून चेहरा जाळला. दहा दिवसांनी अमितचा खून करून त्याचा मृतदेह राजूर येथे निर्जन स्थळी टाकून चेहरा जाळला.

बातम्या आणखी आहेत...