आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक गुन्हे शाखेची कारवाई:वडिलांचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यातील संशयितांची हत्या करणाऱ्या संशयितास पुण्यात अटक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नरकडे येणाऱ्या रोडवर धोंडवीरनगर शिवारात तलवारीने वार करुन ठार केलेल्या इसमाच्या खुनाचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयितून मुलाने वडिलांच्या मित्राचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयिताला तळेगाव दाभाडे पुणे येथून अटक करण्यात आली. प्रवीण चांगदेव तांबे वय 22 रा. गोंदे ता.सिन्नर हल्ली रा.तळेगाव दाभाडे पुणे असे या संशयिताचे नाव आहे.

यागुन्ह्याची अधिक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.बुधवार दि.१ रोजी सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाशिक पुणे रोडवर धोंडवीर नगर शिवारात संपत रामनाथ तांबे वय 32 रा. गोंदे यांचा अनोळखी इसमाने खुन केला होता. सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना मयत इसमाची माहिती घेतली असता तो धोंडवीरनगर येथे सिन्नर येथे वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

त्याचा पुर्वइतिहास तपासली असता त्याच्यावर मागील वर्षी वावी पोलिस ठाण्यात चांंगदेव सुखदेव तांबे वय 45 रा. गोंदे यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. या अपह्त इसमाचा मुलगा संशयित प्रवीण तांबे आणि मयत संपत तांबे याचे जुने वाद होते. यामुळे पोलिसांना प्रवीण तांबेवर संशय बळवला. संशयिताची माहिती घेतली असता तो तळेगाव दाभाडे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. संशयिताचा माग काढण्यासाठी पथके पाठवले. पुणे येथे गेलेल्या पथकाने संशयित प्रवीण तांबे यास ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता मयत संपत तांबे याने वडीलांचे अपहरण केल्याचा राग असल्याने बुधवारी सायंकाळी नाशिक पुणे महामार्गावर गोंदे ते सिन्नर जाणाऱ्या रोडवर मोटार सायकलने पाठलाग करत त्याला एका हाॅटेल जवळ एकटा गाठून धारधार तलवारीने संपत तांबे याच्या मानेवर पोटावर वार करुन ठार केल्याची कबूली दिली. अपर अधिक्षक माधुरी कांगणे, अर्जुन भोसले, निरिक्षक हेमंत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सागर शिंपी, नवनाथ सानप, प्रितम लोखंडे, विश्वनाथ काकड, सागर काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम, सोमनाथ बोराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...