आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे दागिने लुटण्यासाठी महिलेची निर्घृण हत्या:चांदीचे वाळे निघत नसल्याने कोयत्याने तोडले पाय; संशयिताला पाठलाग करून पकडले

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात काम करणाऱ्या महिलेचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेवर हल्ला करत तीचा साडीने गळा आवळून खुन अंगावरील दागिने काढून घेतले. पायातील चांदिचे वाळे निघत नसल्याने फावड्याने पाय तोडून चांदीचे वाळे काढून घेत तोडलेले पाय जमीनीत पुरत पुरवा नष्ट करणाऱ्याचा प्रयत्न केला. पळून जात असलेल्या संशयिताला पथकाने 4 किमी डोंगराळ भागात पाठलाग करत तलावात उड्या घेत अटक केली. किरण ओमकार गोलाईत वय 32 रा. शेजवाळ ता. मालेगाव असे या संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मालेगाव तालुक्यातील दहिद गावाच्या शिवारात पाणताची शेवडी परिसरात शेतात काम करणाऱ्या सुमनबाई भास्कर बिचकुले वय 28 या महिलेचा घोट्यापासून पाय तोडलेला मृतदेह वनजमीनीत दगड व मातीखाली आढळून आला होता. मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याच्या सुचना अधिक्षकांनी दिल्या होत्या. पथकाने घटनास्थळी फाॅरेन्सिक लॅब, श्वान पथकाकडून शोध घेतला असता काही भौतिक पुरावे पोलिसांना मिळाले होते. या पुराव्याच्या अधारे पथकाने घटनास्थळापासून शोध घेतला.

प्रत्यक्षदर्शीने पाहिलेल्या वर्णान आणि कपड्याच्या अधारे पथकाने संशयिताचा माग काढला. पथकाला डोंगराळे गावाच्या जवळ संशयित इसम दिसून आला. पथकाचे शरद मोगल आणि दत्ता माळी यांनी संशयिताचा पाठलाग सुरु केला. संशयिताने पोलिसांना पाहिल्यानंतर पळत तलावात उडी मारली. तो पाण्यात बुडत असतांना कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेत त्याला पाण्याबाहेर काढले.

चौकशीत त्याने 30 जानेवारी दुपारी शेतात निर्जनस्थळी एक महिला एकटीच काम करत असल्याचे पाहिले. तीला पाणी पिण्याचे व मोरवाडी गावाचा रस्ता विचारण्याचा बहाण्याने जवळ बोलवून तीच्या अंगावरील दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने झटापट केली. तीच्या साडीने गळा आवळून फावड्याने डोक्यात वार करुन ठार केले. गळ्यातील सोन्याची पोत हातातील चांदीच्या पाटल्या काढून घेतल्याची कबूली दिली. वरिष्ठ निरिक्षक हेमंत पाटील, मयुर भामरे, रविंद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ सानप, शरद मोगल, नवनाथ वाघमोडे, सुशांत मरकड, सुभाष चोपडा, फिरोज पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...