आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकष्टी चतुर्थी:नाशिकच्या नवश्या गणपतीला 3100 सुर्यफुलांची आरास,10 हजार भाविकांनी घेतले दर्शन, 300 किलो प्रसादाच्या खिचडीचे वाटप

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या नवश्या गणपतीला संकष्टी चर्तूथीच्या निमित्ताने तब्बल 3100 सुर्यफुलांची आरास करण्यात आली हाेती. लाडक्या बाप्पांना करण्यात आलेली सुर्यफुलांची आरास पाहण्यासाठी व दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केेली होती.मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या हाेत्या.

दिवसभरात मंदिरात 10 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त राजू जाधव यांनी दिली.

संकष्टीला फुलांची आरास

नाशिक जिल्ह्यात गंगापूर राेडवरील नवश्या गणपतीला दर महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विविध फळांची, फळांची आरास करण्यात येते. आज मंदिरात खास सुर्यफुलांची आरास करण्यात आली हाेती. विशेष म्हणजे बाप्पांच्या सजावटीसाठी शहरासह मुंबई, पुणे येथून देखील हे सुर्यफूल मागवण्यात आले हाेते.

बाप्पाभोवती आकर्षक सजावट

बाप्पा भाेवती सुर्यफूलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दरम्यान, चतुर्थीनिमित्त बाप्पांना सकाळी मंत्राेच्चरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता आरती करण्यात आली. चतुर्थी असल्याने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या हाेत्या. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पा माेरया, मंगलमूर्ती माेरया असा जयघाेष करण्यात येत हाेता. मंदिर परिसरात प्रसादासह विविध साहित्य विक्रीचे दुकाने थांटण्यात आल्याने परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले हाेते.

300 किलाे खिचडीचे वाटप

नवश्या गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून खिचडीचे वाटप केले. दिवसभरात 300 किलाे खिचडीचे वाटप करण्यात आले.

दर चतुर्थीला आरास

नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव म्हणाले, नवश्या गणपतीला दर चतुर्थीला विविध फळांची, फुलांची आरास केली जाते. आरास व दर्शनासाठी पूर्ण जिल्ह्यातून भाविक येत असतात.