आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या उद्याेजकांना अनेक संधी:यूएईत गुंतवणूक करा; आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांचे आवाहन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यूएईत भारतीय उद्योजकांसाठी असलेल्या गुंतवणुकीच्या संधींचा नाशकातील उद्योजक आणि उदयोन्मुख निर्यातदारांनी लाभ घ्यावा आणि आपली उन्नती साधावी. यूएईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, ऑइल अँड गॅस, फूड इंडस्ट्री, मॅरिटाईम इंडस्ट्री आदी क्षेत्रांत भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीच्या व आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यास चांगली संधी आहे. अशी माहिती अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरींग असाेसिएशन (आयमा)चे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी केले.

भारतीय उद्योजकांसाठी यूएईत गुंतवणुकीच्या कोणत्या संधी आहेत याची माहिती देण्यासाठी तेथील सरकारी अधिकारी चार्ल्स डॅनियल, गोमोन जॉर्ज, जितीन अमीन यांनी नाशिक दौऱ्यात अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन(आयमा) कार्यालयास भेट दिली. यावेळी, आयमाचे पदाधिकारी आणि स्थानिक उद्योजकांबरोबर त्यांची बैठक झाली. या बैठकीत निखिल पांचाळ बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आयमाचे सरचिटणीस ललित बूब, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, वरुण तलवार, हर्षद बेळे तसेच गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम ग्लोबलचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर होते. युएईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग,ऑइल अँड गॅस, फूड इंडस्ट्री, मॅरिटाईम इंडस्ट्री आदी क्षेत्रांत भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीच्या व आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यास चांगला संधी असून तेथे त्याबाबत कोणत्या सुविधा आणि सवलती यूएई सरकारतर्फे दिली जाते आहे याची परिपुर्ण माहिती यूएईच्या अधिकाऱ्यांनी उद्याेजकांना यावेळी दिली.

30 मिनिटांचे सादरीकरण ठरले लक्षवेधी

गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम ग्लोबलचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर यांनी गल्फ राष्ट्रे तसेच आफ्रिकेतील अंगोला, काँगो आणि नायजेरियातील गुंतवणुकीच्या संधीबाबत 30 मिनिटांचे सादरीकरण करून उद्योजकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. नाशिकमधुन युएइ मधील सात प्रमुख अमिरातीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्याेजकांमध्ये उत्सुकता यावेळी दिसून आली. विशेेेेष करून शारजाह, दुबइ,अबुधाबी कडे व्यापार, उद्याेग सुरू करण्यासाठीचा कल यावेळी दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...