आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाता मृत्युसह अर्भक मृत्यूचे प्रमाण राेखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाच्या वतीने महिलांना गर्भधारणा पुर्व आराेग्य सेवा देण्याची नवीन याेजना सुरू करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने ही याेजना सुरू करण्यात आली आहे.
शासनाकडून तीन महिन्यांपासूनच्या गर्भवती महिलेला मोफत आवश्यक सोयी सुविधा दिल्या जातात. मात्र माता मृत्यू व अर्भक मृत्यू रोखण्याबरोबरच नवजात बालकांमध्ये आजार व्यंग उद्भवू नये म्हणून 1 एक जानेवारी 2022-23 पासून महिलांसाठी गर्भधारणा पूर्व आरोग्य सेवा देण्याची नवीन योजना सुरू केली आहे.
या याेजनेमुळे महिलांना गर्भ धारणेची प्लॅनिंग करता येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती महिलांना विविध आरोग्य सेवा दिल्या जातात त्यात प्रसूतीपूर्व, प्रसुतीवेळी, प्रसूतीपश्चात अर्भकाची घ्यावयाची काळजी, निरोगी अर्भकासाठीची काळजी, कमी वजनाच्या आणि आजारी अर्भकासाठीच्या आहेत. मात्र माता मृत्यू , अर्भक, अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण अशा विविध समस्या काही प्रमाणात कायम आहेत.
ही स्थिती बदलावी म्हणून नवीन वर्षापासून गर्भधारणा पूर्व आरोग्यसेवा देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, प्रभारी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, डॉ. युवराज देवरे, डॉ. सचिन खरात यांनी केले आहे.
हे होणार फायदे
गर्भधारणेपूर्वी आरोग्य सेवेमुळे माता मृत्यू, उपजत मृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होईल. तसेच अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण, कमी वजनाचे अशक्त बाळ जन्माला येण्याची प्रमाण कमी होणार आहे. याशिवाय गरोदरपणातील गुंतागुंतीचे प्रकरणेही कमी होईल. तसेच बाळांमध्ये येणारे व्यंगाचे प्रमाण कमी होतानाचा मातेकडून अर्भकाला संसर्गजन्य आजाराचे प्रमाणे कमी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.