आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढील वर्षाच्या २४७७ काेटी रूपयांच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी शिवसेना व भाजपाला खुश करण्याचा आयुक्त तथा प्रशासक डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुरेपुर प्रयत्न केला असून त्याचाच एक भाग म्हणून सर्वांचीच डाेकेदुखी ठरलेल्या पेठराेडसाठी ७ काेटीची टाेकन तरतुद करून भविष्यात स्वखर्चाने क्राॅकीटकरणाचे शिवधनुष्य हाती घेण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, शिवसेनेला खुश करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानातील विविध विकासकामांसाठी विशेष तरतु केली आहे. केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी कर्ज याेजनेंतर्गत पथविक्रेत्यांना दुप्पट कर्ज वितरण केले जाणार असून आगामी निवडणुकीत या याेजनेचा बाेलबाला असणार आहे.
पेठराेडची दुर्दशा झाली असून ८३ काेटीचा खर्च आहे मात्र पालिकेची नाजुक परिस्थीती, नियाेजन समितीकडून निधी मिळत नसल्यामुळे ७ काेटीची तरतुद करून पुढील कामकाज करण्याची हिमंत दाखवली गेली आहे. येथे साधारणत: ३० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. आगामी सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन व आवश्यक कामांसाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला जाणार असून बाह्यरिंगरोड, अंतर्गत रिंगरोड तसेच मिसिंग लिंक जोडण्यासाठी टीडीआर, एफएसआयच्या माध्यमातून भूसंपादन केले जाणार आहे.
भाजपाचा ड्रीम प्राेजेक्ट असलेल्या निओ मेट्रोसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात असून दादासाहेब फाळके स्मारकाचा रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर विकास करण्याची योजना आहे. तवली फाटा परिसरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडीअमसाठी तरतूद करण्यात आली आहे. शिवसेनेचे युवा पदाधिकारी सचिन भाेसले यांच्या पाठपुराव्यातून यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळासाठी नव्याने स्वारस्य देकार मागविले जाणार आहे.
टिकरिंग लॅबच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर
महापालिकेच्या माध्यमातून टिंकरिंग लॅब उभारून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर व कॉमन फॅसिलिटी सेंटरची उभारणी केली जात आहे. येथे वर्षभरात किमान १०० कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. टिंकरींग लॅबअंतर्गत मायक्रो कोर्सेस, विविध समुदायांसाठी नवीन प्रकल्प राबविण्याची योजना आहे.
असा येणार निधी(आकडे कोटीत)
असा खर्च होणार(आकडे कोटीत)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.