आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:तत्कालीन सिडको प्रशासक ठाकूर यांचा न्यायालयाने जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको प्रशासनाचा प्लॉट महापालिकेकडे हस्तांतरित झाला असताना देखील तत्कालीन सिडको प्रशासकाने पदाचा गैरवापर करत दोघांच्या मदतीने कागदपत्रांवर खाडाखोड करून प्लॉटची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तत्कालीन सिडको प्रशासक घनश्याम ठाकूर यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात सोमवारी न्यायालयाने यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला.

नाशिक येथील सिडको प्रशासकीय कार्यालयातील तत्कालीन प्रशासक घनश्याम ठाकूर, लिपिक हर्षद खान, यांनी गैर मार्गाने कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून, संगणमत करून कोणताही अधिकार नसताना राणेनगर येथील स्वामी विवेकानंद पुतळ्याशेजारील सिडकोचा सर्वे नंबर ९२९ सेक्टर १४ बी नेबरहूड मार्गशीर पॉकेट क्रमांक बी १४ येथील ३७५९ चौरस मीटरचा प्लॉट ज्ञानेश्वर सोनवणे यांना परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता.

यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी न्यायालयात झाली असता न्यायालयाने तत्कालीन प्रशासक यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. आता सिडको प्रशासकसह लिपिकाने परस्पर विक्री केलेली भूखंड प्रकरणे समोर येण्याची दाट शक्यता असल्याने सिडकोत एकच खळबळ उडाली आहे.

न्यायलयाने अटकपूर्व नामंजूर केल्याने त्यांना अटकेचे टाके तलवार कायम आहे या प्रकरणाने सिडको प्रशासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.