आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik News Industrial Peace Committee Reinstatedअखेर औद्योगिक शांतता‎ समिती हाेणार पूर्ववत‎, पोलीस आयुक्तांची उद्योजकांच्या बैठकीत ग्वाही‎

प्रशासकीय:अखेर औद्योगिक शांतता‎ समिती हाेणार पूर्ववत‎, पोलीस आयुक्तांची उद्योजकांच्या बैठकीत ग्वाही‎

नाशिक‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक‎ उद्योजकांचे प्रश्न साेडविण्यासाठी‎ पूर्वी औद्योगिक शांतता समिती‎ कार्यरत होती, यात महापालिका, ‎एमआयडीसी, पोलिस यांसारख्या ‎यंत्रणांचे जबाबदार अधिकारी, ‎औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी ‎सदस्य होते. यामुळे औद्योगिक‎ शांतता कायम राहण्यास मदत होत‎ होती, ही समिती पूर्ववत करावी‎ अशी मागणी निमाच्या वतीने‎ करण्यात आल्यानंतर समिती पुन्हा कार्यरत करणार‎ असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त अंकुश शिंदे‎ यांनी दिली.

औद्योगिक क्षेत्रात कायदा‎ व्यवस्था सुस्थितीत रहावी याकरीता पोलिस‎ आयुक्त शिंदे यांनी औद्योगिक संघटना अाणि‎ निपमसह विविध कंपन्यांचे एचआर मॅनेजर‎ यांची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. ११) पोलिस‎ आयुक्तालयात बाेलावली होती, त्यात शिंदे‎ बाेलत होते. व्यासपिठावर ‘निमा’चे अध्यक्ष‎ धनंजय बेळे, पोलिस उपायुक्त चंद्रकात खांडवी,‎ डाॅ. प्रशांत बच्छाव आदी होते. तर बैठकीला‎ एमआयडीसी, महापालिकेचे अधिकारी तसेच‎ निपमच्या पदाधिकाऱ्यांसह निमाचे उपाध्यक्ष‎ किशोर राठी, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, विरल‎ ठक्कर, कैलास पाटील, कैलास साेनवणे,‎ प्रकाश ब्राह्मणकर, शरद देवरे यांच्यासह अनेक‎ उद्याेगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.‎

पूर्ण सहकार्य‎

एमआयडीसीतील अतिक्रमणांमुळेच‎ अवैध व्यवसायही सुरू आहेत,‎ सार्वजनिक तसेच मालवाहू वाहने‎ कोठेही पार्किंग केली जातात, यामुळे‎ वाहतुक कोंडी, अपघात वाढल्याकडे‎ धनंजय बेळे यांनी लक्ष वेधले. त्यावर‎ महापालिका, वाहतुक पोलिस,‎ एमआयडीसी संयुक्तपणे औद्योगिक‎ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पहाणी‎ करून पार्किंगच्या जागा निश्चित करु‎ असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.‎