आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन विशेष !:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून अभिवादन; विविध सामाजिक संस्थाकडून उपक्रम

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने शिवाजी रोड, शालीमार, येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे व महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभाग सरचिटणीस सुरेश मारु व रमेश साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस सुरेश मारु यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजही बाबासाहेबांचे विचारच फक्त देशाला तारु शकतात व त्यांच्या विचारांचाच वारसा देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे म्हणाले की, देशातील माणुसपण केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात असुन काही राजकीय पक्ष देशात सामाजिक तेढ निर्माण करुन माणसाला माणसात वाटण्याचं काम करत असुन जातीवादाला खतपाणी घातले जाते आहे त्यामुळे समाजातील बुध्दीजीवी वर्गाने याकडे डोळेझाक करून चालणार नाही असे स्पष्ट करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सुरेश मारु, रमेश साळवे, राजकुमार जैफ, अण्णा मोरे, अशोक शेंडगे, मनोहर अहिरे, मिलिंद हांडोरे, प्रा. प्रकाश खळे, अ‍ॅड विकास पाथरे, अमोल मरसाळे, गोरख साळवे, गोविंद गायकवाड आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निर्वाण फाऊंडेशन यांच्या तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या स्तूपाला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

भिक्कू संघ, वेगवेगळ्या समविचारी संस्थांचे पदाधिकारी, निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश आंबेडकर, चरिका फाऊंडेशनचे अध्यक्ष मिलिंद बनसोडे व निर्वाण फाऊंडेशनचे पदाधिकारी उपास्थित होते. यावेळी फाउंडेशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यातील महत्त्वाच्या घटना सांगून त्यांना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्याची महती विषद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...