आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंध फुलांचा गेला सांगून:आठवणींच्या ‘हिंदोळ्या’वर स्वरांची बरसात; ‘मराठी आठव दिवस’ उत्साहात

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांग कधी कळणार तुला..., मी डोलकर, दर्याचा राजा, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले..., एक धागा सुखाचा..., प्रभो शिवाजी राजा.. अशा आठवणीतल्या कप्प्यातील अजरामर गाण्यांच्या हिंदोळ्यावर नाशिककर रंगले आणि मराठी आठव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येताे. त्यानिमित्ताने स्वामीराज आणि सत्कार्य या संस्थेतर्फे दर महिन्याला विविध ठिकाणी मराठी आठव दिवस साजरा होत आहे. यंदा नाशिकच्या कालिदास कलामंदिरात गंथ स्वरांचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संत ज्ञानेश्वरांच्या ‘मोगरा फुलला..’ या अभंगाने सुरू झालेली सुरेल गाण्यांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. चोरीचा मामला मामा ही थांबला..., गोमू संगतीनं माझ्या तू येशील का..., गं साजणी..., मी डोलकर, दर्याचा राजा अशी जबरदस्त गाणी आणि त्याला तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नेहमीच राया तुमची घाई, येऊ कशी कशी मी नांदायला... छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी, या रावजी बसा भावजी... या ठसकेबाज लावण्यांनाही रसिकांनी दाद दिली. अभिनेत्री समिरा गुजर हिने कार्यक्रमाचे उत्तम निवेदन केले.

पोलिस उपायुक्त रूपाली अंबुरे-खैरमोडे आणि महाराष्ट्राचा सुरेल आवाज माधव भागवत यांनी सुमधुर आवाजात, तर राजू जवळकर, अविनाश इनामदार, समीर शिवगर यांनी ढोलकी, तबला, सिन्थेसायझरवर साथ देत सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात दाद दिली. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, सत्कार्य फाउंडेशनचे आयोजक बाबासाहेब गायकवाड (देशमुख), ज्येष्ठ पत्रकार रजनिश राणे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...