आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेत निर्मित गुटखा वाहतूक करणाऱ्याला पकडले:कारमधून 2 लाख 89 हजारांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेचे कारवाई

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात राज्यात निर्मित गुटखा राज्यात विक्री करण्यासाठी प्रतिबंध असलेला गुटखा कार मधून वाहतूक करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. संशयिताच्या कार मधून २ लाख ८९ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखा युनिट १ चे पथक पेठरोड परिसरात गस्त करत असतांना पथकाने हवालदार कविश्वर खराटे यांना माहिती मिळाली गुजरात मधून एक संशयित अवैध गुटखा वाहतूक करत असल्याने पथकाने पेठरोडवर सापळा रचला. संशयित कार (एम.एच. ०४, एच.बी. ८८८२) कार येत असताना पथकाने कार थांबवली. कार चालक संशयित जीत अमृतभाई पटेल (रा. म्हसरुळ) याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. कारमध्ये पांढऱ्या गोण्या आढळून आल्या.

गोण्या फोडून पाहिल्या असता त्यात गुजरात राज्यात निर्मित गुटखा मिळून आला. संशयिताच्या विरोधात अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा अधिनियम अंतर्गत म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

शहरात अवैध गुटखा विक्री

शहरात अवैध गुटखा विक्री होत असल्याचे कारवाईतून स्पष्ट होत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरात पान दुकानांवर छापेमारी सुरु आहे. पोलिस ठाण्याच्या पथकाकडून कारवाई सुरु आहे.

शहरात नाशिकरोड, द्वारका, पंचवटी परिसरात गुटखा किंग अद्याप मोकाट आहेत.सुभाषरोड,पळसे द्वारका काठे गल्ली येथे गुटख्याचे मोठे साठेबाज असल्याची माहिती खुद्द पोलिसांना आहे. पथकांकडून किरकोळ साठेबाजांवर कारवाई केली जात आहे. मोठे साठेबाज अद्याप मोकाट असल्याने या साठेबाजांवर अद्याप पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने कारवाईबाबात संभ्रम आहे. शहरात सर्रासपणे अवैध गुटखा विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने विभागावर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

बातम्या आणखी आहेत...