आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपेंद्रनगर परिसरात गॅस पाईपलाईनच्या कामासाठी सुरू असलेल्या कामामुळे सलग दुसऱ्या दिवशीही जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय तर झालाच मात्र यामुळे या संपूर्ण परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक विशेषत: महिला हैराण झाल्या आहेत. शनिवारी फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती पालिकेने रविवारी (दि. ५) केलीच नाही. त्यामुळे संतप्त माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांनी रहिवाशांसाेबत हे काम बंद पाडले.
उपेंद्रनगर भागात अंबड लिंकरोड हा मुख्य रहदारीचा रस्ता असून या भागात बांधकाम विभागाच्या वतीने काही दिवसांपासून पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे ते अर्धवटच साेडण्यात आले आहे. अजूनही अर्धवट स्वरूपात साेडून दिले आहे. याठिकाणचे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यातच गॅस पाईप लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्य रहदारीचा रस्ता असताना गॅस पाईप टाकताना बाजूच्या रस्तयाने काम करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने नियम धाब्यावर बसवत, काम करणाऱ्या ठेकेदाराला कशाच्या आधारे परवानगी दिली? हा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
शनिवारी व रविवारी या ठिकाणी गॅस पाईप लाईनचे काम सुरू असताना बेजबाबदारपणामुळे पिण्याची जलवाहिनी फुटून संपूर्ण परिसरात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला. उपेंद्रनगरसह शुभमपार्क, बुरकुले लाॅन्स सह, उत्तमनगरच्या काही भागात अनेक ठिकाणी पाणीच न आल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी व वणवण भटकावे लागले.
प्रशासनाची बेफिकिरी उघड
शनिवारी सकाळपासून अंबड लिंक रोड या मुख्य रहदारी रस्त्यावरील जलवाहिनी फुटले असताना लाखो लिटर पाणी सर्वत्र वाहत असताना रहिवासी व माजी नगरसेवकांनी मनपा सिडको विभागाकडे तक्रार देखील केली. मात्र, तात्पुरती करून दुसऱ्या दिवशी पुन्हा जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया गेले.
यामुळे परिसरातील उपेंद्र नगर उत्तम नगर बुरकुले लॉन्स या सहभागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने रहिवाशांना फटका बसला. अनेक रहिवाशांना पाण्यासाठी वन वन घ्यावे लागले तर मोठ्या सोसायटी यांना टँकरद्वारे पाणी मागवावे लागले केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या समस्याला सामोरे जावे लागले असे प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.