आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2019-20 या वर्षी करीताचा राष्ट्रीय युवा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील जय योगेश्वर बहुउद्देश्यीय संस्थेला प्रदान करण्यात आला आहे.
केंद्रिय युवा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई , कर्नाटक राज्यपाल थावरचंद गहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार विनित मालपुरे यांनी स्वीकारला. यावेळी पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, तिन लक्ष रुपये देऊन संस्थेस सन्मानित करण्यात आले.
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांचे कडून, राष्ट्रीय विकास किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करणे, तरुणांना समाजाप्रती जबाबदारीची भावना विकसित करण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने नागरिकांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय युवा पुरस्कार दिला जातो.
राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 हा 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 दरम्यान कर्नाटक राज्यात हुबळी धारवाड येथे आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये संस्थेने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.
संस्थेचे सदस्य सागर काठे, तुषार पाटील, हेमंत जाधव, सुमित रेलकर धिरज मालपुरे, यांचे राष्ट्र उभारणीत असलेले योगदान महत्तवपूर्ण आहे. या योगदानाची दाखल घेत या संस्थेस राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, युवक चळवळ यांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.