आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक जिल्ह्यात पाहणी दाैरा:खासगी रुग्णालयांच्या बिलांचे फक्त ऑडिटच नव्हे, तर याेग्य तपासणीही करावी : देवेंद्र फडणवीस

नाशिक10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी रुग्णालयात काेराेनाबाधितांवर उपचार करताना रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त हाेत असून जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालयाने त्यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खासगी रुग्णालयांवर नियंत्रणासाठी समिती स्थापन केली असली तरी या समितीने केवळ बिलांचे आॅडिटच करू नये तर त्यांची याेग्य तपासणी करावी आणि खासगी रुग्णालयांकडून हाेणारी रुग्णांची आर्थिक लूट थांबवावी, अशा सूचना विराेधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यंानी जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दाैऱ्यानंतर केल्या. त्यांनी महापालिका रुग्णालय, नाशिकराेड येथील महापालिकेच्या नवीन इमारतीत सुरू झालेलेल काेविड केअर सेंटर येथे पाहणी केली आणि विभागीय आयुक्तालयात आढावा बैठकदेखील घेतली. जिल्हा शासकीय रुग्णालय येथून या दाैऱ्याला प्रारंभ झाला. प्रारंभी त्यांनी काेराेनाबाधित गर्भवती महिलांच्या वाॅर्डात जाऊन उपचाराबाबत विचारपूस केली.

दरेकरांच्या वाहनाला किरकोळ अपघात

नाशिक व मालेगावचा दौरा आटोपून जळगावकडे जात असताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. एका ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले, दरेकर व इतर सर्वच सुरक्षित आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही.

बातम्या आणखी आहेत...