आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकची देशातील सर्वोत्तम शैक्षणिक हबकडे वाटचाल:जेएलएल आणि क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पाहणी अहवालातील निष्कर्ष

नाशिकएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात उपलब्ध अनेक संधी, सामाजिक व सांस्कृतिक समरसता तसेच आर्थिक समतोल या मुळे नाशिक हे देशातील आणि जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी पसंतीचे ठिकाण बनत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

जगप्रसिद्ध सल्लागार संस्था जे एल एल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे संयुक्त रित्या केल्या गेलेल्या ' फाईनएस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया' या विषयावरील पाहणी अहवाल आज शेल्टर च्या उद्घाटन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

नाशिकचे हवामान, मुबलक पाणी ,भारतातील आघाडीच्या शहरांपेक्षा कमी प्रदूषण पातळी, तेथील सुंदर नैसर्गिक लँडस्केप आणि परवडणारे राहणीमान यामुळे ते भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहरांपैकी एक बनले आहे.

या सर्वेक्षणाबाबत बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की एज्युकेशन हब म्हणून विकसित होण्यासाठी नाशिककडे योग्य घटक आहेत. एक उदयोन्मुख नॉलेज हब म्हणून शहरामध्ये प्रचंड क्षमता असताना, हबला चालना देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ज्ञानाचे पोषण करणारी इकोसिस्टम तयार करणे महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे, शहराने देऊ केलेल्या शिक्षणाच्या शक्यता आणि सुविधा सर्वोच्च क्रमाच्या असाव्यात. समांतर, आर्थिक परिस्थिती आणि स्थानिक आकांक्षा यांच्याशी सुसंगत असलेल्या काही विशिष्ट संस्था देखील विकसित केल्या पाहिजेत.

जे एल एल चे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक करण सिंग सोडी, यांनी सांगितले की देशाला सामर्थ्यवान बनण्यासाठी दर्जेदार आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची निर्मिती यामुळे देशाच्या अर्थकारणात सकारात्मक बदल होणार आहेत. या दर्जेदार शिक्षणासाठी परदेशातून असंख्य विद्यार्थी देशात येऊ शकतात. यामुळे देशाच्या आर्थिक विकासात अश्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठे याचे जाळे तयार होणे आवश्यक आहे. 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात एकूण 38.5 दशलक्ष विद्यार्थी असल्याचा अंदाज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टां प्रमाणे वर्ष 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये हीचं नोंदणी संख्या दुप्पट होईल असे लक्ष्य आहे. ही उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठी मोठ्या संधी आहे. देशातील विद्यमान शिक्षण केंद्रे आपल्या मोठ्या युवा लोकसंख्येला कौशल्य आणि शिक्षित करण्यासाठी पुरेसे नाहीत. मागणीतील ही मोठी तफावत दूर करण्यासाठी, सध्याचा अभ्यास नवीन नवीन शैक्षणिक हब तयार करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करतो, जसे की नाशिक, जे देशांतर्गत तसेच परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी उदयोन्मुख शिक्षण केंद्रासाठी एक संभाव्य गंतव्यस्थान आहे.

बातम्या आणखी आहेत...