आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठातर्फे लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असून परीक्षेबाबत नियोजनही सुरू झाले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून त्या सप्टेंबरमध्ये होणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. यूजीसीने मंगळवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास विद्यापीठांना परवानगी दिली आहे. मुक्त विद्यापीठाने आता पदवी व पदव्युत्तर अव्यावसायिक शिक्षणक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी असाव्यात की दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्न असावेत यावर परीक्षा नियंत्रक विचारविनिमय करत आहेत. येत्या आठवड्यात याविषयी अंतिम निर्णय घेऊन परीक्षेचे वेळापत्रकच जाहीर करण्यात येणार आहे.
व्यवस्थापन, संगणकशास्त्र विषयाचीही परीक्षा होणार
व्यावसायिक शिक्षणक्रमात व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र व शिक्षणशास्त्र याविषयीच्याही परीक्षा होणार आहेत. विद्यापीठातर्फे हा आदेश लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.