आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्य नागरिकांना अस्थिरोग विषयांबद्दल माहिती देणार:नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटीचे सचिव डॉ. गोपाळ शिंदे यांचे प्रतिपादन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदग्रहण सोहळ्यात नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटीचे नवनिर्वाचित पदाधिकारी समवेत महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अजित शिंदे, मेजर जनरल डॉ. सुशील कुमार झा, विशिष्ट सेवा मेडल (नि.) आदी - Divya Marathi
पदग्रहण सोहळ्यात नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटीचे नवनिर्वाचित पदाधिकारी समवेत महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अजित शिंदे, मेजर जनरल डॉ. सुशील कुमार झा, विशिष्ट सेवा मेडल (नि.) आदी

संघटनेच्या माध्यमातून राज्यातील अस्थिरोग विषयात एम.एस. या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शैक्षणिक वर्ग व प्रात्यक्षिके आयोजित करणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव व महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेचे सहयोगी प्राध्यापक (अस्थिरोग) तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. गोपाळ शिंदे यांनी दिली.

नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटी ही तीस वर्षांपूर्वी स्थापित संघटना असून तीचा उद्देश अस्थिरोग विषयी वैद्यकीय शिक्षणाचे तसेच नवनवीन उपचार व शल्यचिकित्सेच्या ज्ञानाचे देवाणघेवाण करणे हा असल्याचे प्रतिपादन संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय धुर्जड यांनी केले. जिल्ह्यातील सर्व अस्थिरोग तज्ञांच्या अडीअडचणी सोडवणे व कल्याणाचे धोरण असल्याकडे डॉ. धुर्जड यांनी लक्ष वेधले.

जून महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत डॉ. धुर्जड यांची तसेच डॉ. गिरीश औताडे यांची उपाध्यक्ष, डॉ. गोपाळ शिंदे यांची सचिव व डॉ. पुनीत शाह यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा पद्ग्रहन सोहळा महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अजित शिंदे, महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मेजर जनरल डॉ. सुशील कुमार झा, विशिष्ट सेवा मेडल (नि.) यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

मुंबईचे डॉ. संदीप बिरारीस, सोलापूरचे डॉ. प्रदीप कोठाडीया, जालन्याचे डॉ. प्रकाश सिगेदार व नाशिकचे प्लास्टिक सर्जन डॉ. राजेंद्र नेहेते यांची यावेळी व्याख्याने झाली. कार्यक्रमास, ज्येष्ठ सदस्य डॉ. रमेश मंत्री, डॉ. संजय गणोरकर, डॉ. मुकेश अग्रवाल व इतर सदस्य उपस्थित होते. डॉ. प्रशांत भुतडा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...