आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक ऑक्सिजन गळती:या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र पहायला मिळाले- सुधीर मुनगंटीवार

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशासनाने गरजूंना तात्काळ मदत उपलब्ध करावी- देवेंद्र फडणवीस

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळतीमुळे रुग्णांचे प्राण जात आहेत. दरम्यान, या घटनेवरुन भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर निशाणा साधला आहे.

याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. यात मानवी चूक असेल तर चौकशी करून कारवाई करा, प्रशासन अधिक सुधारण्याची गरज आहे, जो प्राण वाचविणारा घटक आहे त्याचीच गळती म्हणजे गंभीर स्थिती आहे. राज्यात अन्यत्र अशा घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे, प्रशासनाला तांत्रिक चुका टाळण्यासाठी स्पष्ट सूचना देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

प्रशासनाने गरजूंना तात्काळ मदत उपलब्ध करावी- देवेंद्र फडणवीस नाशिक घटनेवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रशासनाने आता तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...